जेष्ठ पत्रकार अविनाश नलावडे यांचे निधन, रविवारी सकाळी अंतिम संस्कार...
पत्रकार अविनाश नलावडे यांचे निधन, रविवारी सकाळी अंतिम संस्कार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- दैनिक भास्करचे जेष्ठ पत्रकार अविनाश भिवसनराव नलावडे (वय 50,मूळ गाव शेखपूरवाडी, ता. खुलताबाद, ह.मु. रा. भानुदासनगर, छत्रपती संभाजीनगर) यांचे हृदयविकाराने शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर रविवारी सकाळी 11 वाजता कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांचे बंधू शिवाजी नलावडे यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, असा परिवार आहे. अविनाश यांनी दैनिक औरंगाबाद सिटीझन्समधून पत्रकारिता सुरू केली होती. दैनिक नवा मराठा, दैनिक इन्साफ-ए-आलम, दैनिक भास्करमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांच्या अचानक निधनाने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
What's Your Reaction?