नामांतरावर सुनावणी सुरु असताना औरंगाबाद बेंचचे रजिस्ट्रारने काढले नाव बदलण्याचे सर्कुलर, याचिकाकर्त्याने घेतला आक्षेप

नामांतरावर सुनावणी सुरु असताना औरंगाबाद बेंचच्या रजिस्ट्रारने काढले नाव बदलण्याचे सर्कुलर, याचिकाकर्त्यांने घेतला आक्षेप...
एवढी घाई कशासाठी असा प्रश्न नागरिक विचारत आहे...
औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरावर मुंबई मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयात सुनावणी मुख्य न्याधीशांसमोर सुरू आहे. 8 जानेवारी 2024 रोजी पुन्हा सुनावणी बॉम्बे उच्च न्यायालयाचे दोन न्यायाधिशांसमोर या प्रकरणात याचिकाकर्त्यांचे सिनिअर कौन्सिल युक्तिवाद करणार आहे. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव करण्याच्या विरोधात प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बॉम्बे उच्च न्यायालयाचे औरंगाबाद बेंचचे रजिस्ट्रार पि.बी.घुगे यांनी 18 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर व धाराशिवचा उल्लेख कामकाजात करावा असे सर्क्युलर काढल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी असताना अशा प्रकारे सर्कुलर काढणे काय दर्शवते असा प्रश्न याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी व संजय वाघमारे यांनी उपस्थित करत यावर आक्षेप घेतला आहे. सर्कुलर मागे घ्यावा नाही तर मुख्य न्यायाधीशांकडे रजिस्ट्रार यांचे विरोधात तक्रार केली जाईल असे दिलेल्या पत्रात नमूद आहे. त्यांनी रजिस्ट्रार यांना पत्र लिहून हा सर्कुलर निकाल येईपर्यंत मागे घेण्याची मागणी केली आहे. या सर्कुलरचा वापर करून प्रशासनाने सर्व ठिकाणी नाव बदलण्याचा प्रक्रियेला हालचाली तेज केली आहे, व उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाच्या नाव पुसून तिथे धाराशिव लिहले आहे तसेच राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा प्रशासनाने नाव बदलायला सुरवात केली आहे. नाव बदलण्याचे सर्कुलर काढणा-यांना एवढी घाई कशासाठी असा प्रश्न नागरिक विचारत आहे. याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी व संजय वाघमारे यांनी आक्षेपाची एक प्रत बॉम्बे हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीशला पुरावे सहित पाठवली आहे
.
What's Your Reaction?






