निवडणुकीपूर्वी नामांतराचा निर्णय येण्याची शक्यता, अंतिम सुनावणी संपली, निर्णय राखिव
निवडणुकीपूर्वी नामांतराचा निर्णय येण्याची शक्यता, सुनावणी संपली, निर्णय राखिव
औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा निर्णयाची प्रतीक्षा संपणार....!
मुंबई, दि.18(डि-24 न्यूज)
बाॅम्बे हायकोर्टात आज दुपारी औरंगाबाद शहर नामांतरावर सुनावणी संपली. सुनावणीच्या शेवटच्या दिवशी नामांतर विरोधी याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांच्या वतीने सिनिअर कौन्सिल अनिल अंतूरकर यांना न्यायालयाने युक्तिवाद करण्याची संधी दिली होती. अंतुरकर यांनी न्यायालयात कशा पद्धतीने सरकारने चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर पणे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले हे दाखवून दिले. ऐतिहासिक शहराचे नामांतर होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन तास हि सुनावणी झाली यावेळी सरकारी वकील सराफ यांचीही उपस्थिती होती.
अशी माहिती मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले न्यायालयाने निकाल राखिव ठेवला आहे काही दिवसांत निकाल येण्याची अपेक्षा आहे. न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. आता सुनावणी संपली आहे. शासनाने ऐतिहासिक औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद चे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आहे याविरोधात सुनावणी आता संपली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर निकाल येण्याची शक्यता आहे. देश व महाराष्ट्रातील जनतेचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. यावेळी मोहंमद हिशाम उस्मानी यांचे वकील एड एस.एस.काजी, त्यांचे सहकारी एड मोईन शेख, मोईनोद्दीन जागीरदार यावेळी न्यायालयात उपस्थित होते. यावेळी याचिकाकर्ते यांच्या वतीने महत्वाचे कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
What's Your Reaction?