पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेचे स्तंभपूजन

 0
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेचे स्तंभपूजन

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेचे स्तंभपूजन

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर गुरुवार, ता.14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहिर विराट सभेचे विधिवत स्तंभपूजन सोमवार, ता. 11 नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार उदयसिंग राजपूत ( कन्नड ) दिनेशसिंग परदेशी ( वैजापूर), सुरेश बनकर ( सिल्लोड), दत्ता गोर्डे ( पैठण), बाळासाहेब थोरात ( संभाजीनगर मध्य), राजू शिंदे ( संभाजीनगर पश्चिम), लहू शेवाळे ( संभाजीनगर पूर्व ), सतीष चव्हाण ( गंगापूर ) व विलास औताडे ( फुलंब्री) यांच्या विजारार्थ नारळ अर्पण केले. 

संभाजीनगरातील सभा गर्दीचा उच्चांक प्रस्थापित करणार असून संपूर्ण जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचा विचार घरोघरी पोहोचणार, असल्याची भावना अंबादास दानवे यांनी यावेळी व्यक्त केली. 

याप्रसंगी शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन, प्रभारी जिल्हाप्रमुख त्र्यंबक तुपे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख,जिल्हा समन्वयक डॉ. शोएब हाश्मी,सुभाष पाटील, प्रसाद सामंत,विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे,सुगंध कुमार गडवे,शेख रब्बानी,प्रितेश जैस्वाल,महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सुनिता देव, अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशाताई दातार, महानगर संघटक मीना फसाटे, उपजिल्हा संघटक नलेनी महाजन,नलेनी बाहेती,शहर संघटक सुनिता सोनवणे,सुनिता औताडे, शहराध्यक्ष मेहराज पटेल, तालुका संघटक अर्चना सोमासे, विधानसभा संघटक कविता सुरळे, कृष्णा भोसले, संतोष पंडूरे, गणेश उचाडे, संदीप सपकाळ, बाळासाहेब साळवे, संदीप हिरे, सुधीर घाडगे, किशोर साळवे, अंकित खंडेलवाल, यशवंत खडसे, विशाल मुळे, जीवन गायकवाड, तुळशीदास कचरे, मीरा पूच्छे, नेहा नाडे, संध्या भिसे, सिताबाई नाडे, सिंड्रेला चांदणे, उर्मिला रोखडे, निकिता भिसे, पायल वाघमारे, दिव्या हिवराळे, दिपाली राजगुरू, रोहिणी पवार, अलका इंगळे, वृषाली पवार, कार्तिकी पवार, दिपाली सोनवणे, मंगल पवार व मनीषा घोडके उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow