महीला डॉक्टरला आत्महत्येस परावृत्त करणा-या दोषींना फाशीची शिक्षा द्या - आमेर अब्दुल सलिम
महीला डॉक्टरला आत्महत्येस परावृत्त करणा-या दोषींना फाशीची शिक्षा द्या - आमेर अब्दुल सलिम
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(प्रतिनिधी), सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महीला डाॅक्टरला आत्महत्येस परावृत्त करणा-या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी. पोलिस प्रशासन व राजकीय दबावामुळे या डॉक्टरचा बळी गेला. तक्रार देऊन सुद्धा कार्यवाई झाली नाही. कार्यवाई झाली असती तर निष्पाप महीला डॉक्टरचा बळी गेला नसता. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून गृहखाते सांभाळत आहेत तेव्हापासून महीलांवरील अत्याचार वाढत आहे या घटनेनंतर त्यांनी राजीनामा द्यावा. सदरील घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आमेर अब्दुल सलिम यांनी केली आहे.
पैठण गेट येथे सायंकाळी डॉक्टर महीलेला न्याय मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली मेणबत्ती पेटवून श्रध्दांजली वाहिली.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहीम पठाण, माजी शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम, महीला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, डॉ.पवन डोंगरे, आकेफ रझवी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर नागरे, गौरव जैस्वाल, एनएसयुआयचे शेख अथर, मोईन कुरेशी, मुजफ्फर खान, इद्रीस नवाब, अब्दुल्लाह शकील, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.शादाब शेख, मो.एहतेशाम, इरफान इब्राहीम पठाण, शेख फैज, सुफीयान पठाण, शिरीष चव्हाण, मजाज खान, ओसामा नासेर खान, इम्रान खान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?