माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना काँग्रेसचे अभिवादन

 0
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना काँग्रेसचे अभिवादन

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना शहर जिल्हा काँग्रेस तर्फे अभिवादन...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)

शैक्षणिक संस्थांची उभारणी, विज्ञान-तंत्रज्ञानाचा पाया, औद्योगिकीकरणाची दिशा, लोकशाहीच्या मूल्यांवरील निष्ठा आणि सर्वसमावेशक भारताचे स्वप्न पंडित जवाहरलाल नेहरू यांचे देशासाठीचे योगदान अमूल्य आहे. ते स्वातंत्र्यानंतरच्या भारताला आधुनिकतेकडे घेऊन जाणारे आधुनिक भारताचे खरे शिल्पकार होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अशा दूरदृष्टीच्या नेत्यास आज मंगळवार, दि.२७ मे २०२५ रोजी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या छावणी येथील पूर्णाकृती पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले. 

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, इक्बालसिंग गिल, कैसर बाबा, उमाकांत खोतकर, संघठन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, डॉ. अरुण शिरसाठ, अनिताताई भंडारी, शेख निसार अहमद, संजय धर्मरक्षक, शफिक शहा, शेख युनूस, उषा खंडाळे, रेखा भुईगल, कणसे मामा, सुनील साळवे, मुद्दसिर अन्सारी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow