मोठी बातमी... काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक...!

मोठी बातमी....काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक...
अजिंठा बॅंक गैरव्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसल्याने अटकेची कारवाई
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अजिंठा अर्बंन बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. आज त्यांना पोलिसांनी अटक केली. 21 जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता तेव्हापासूनच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज अखेर सुभाष झांबड यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड अजिंठा अर्बन बॅँकेचे अध्यक्ष असून बँकेमधील 98 कोटी 48 लाख व 21 कोटी रूपयाच्या घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर शहरातील सिटीचौक पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा ऑक्टोबर 2023 मध्ये दाखल असून दुसरा गुन्हा हा नोव्हेंबर 2024 दाखल झालेला आहे.
यादरम्यान पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. यापुर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्यांच्या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी झांबड पोलिसांसमोर हजर झाले आणि पुन्हा जामीनासाठी अर्ज केल्यास त्यावर न्यायालयाने तत्काळ निर्णय घ्यावा,असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. यापुर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. म्हणून आज त्यांना अटक करण्यात आली.
What's Your Reaction?






