मोदींचे आगमन आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे काळे कपडे परिधान करून आंदोलन
मोदींचे आगमन आणि महाविकास आघाडीच्या वतीने काळे कपडे परिधान करून आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.25(डि-24 न्यूज)
देशात वाढत्या महिला अत्याचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर आले असल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत जाब विचारण्यासाठी आज शहरातील चिकलठाणा विमानतळासमोर महाविकास आघाडीच्या वतीने काळे कपडे व हातात निषेधाचे फलके घेऊन निषेध आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यात महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम नसल्याने पंतप्रधानाकडे आम्ही माता-भगिनींच्या सुरक्षेची हमी मागितली. महाराष्ट्रात मजबूत सरकार नसल्याने पंतप्रधान यांनीच आता राज्यात लक्ष घालावे अशी मागणी या आंदोलनादरम्यान केली.
यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व कार्यवाही करुन सोडले. याप्रसंगी विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य, काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसूफ, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, मुन्नाभाई, तय्यब खान, फेरोज खान, संतोष जेजुरकर, विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब गायकवाड, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, मनोज गांगवे, रघुनाथ पाटील, सचिन तायडे, योगेश मसलगे, मोईन कुरेशी, दुर्गा भाटी, सुकन्या भोसले, दिपाली मिसाळ, प्रतिभा राजपूत, नुसरत जहां, रेखा फलके, सुनीता पाटील, पद्मा तुपे, मीना थोरवे, दिपाली बोरसे, प्राप्ती वैष्णव, सरोज मसलंगे व रेखा शहा उपस्थित हो
ते.
.
What's Your Reaction?