शेवटच्या दिवशी डॉ.गफ्फार कादरी भरणार उमेदवारी अर्ज
 
                                शेवटच्या दिवशी डॉ.गफ्फार कादरी भरणार उमेदवारी अर्ज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर डॉ.गफ्फार कादरी हे शेवटच्या दिवशी 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मोटारसायकल रॅली औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जालना रोड येथील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            