संजना जाधव शिवसेनेत, कन्नडमध्ये पती विरुद्ध पत्नी सामना रंगणार...?
संजना जाधव शिवसेनेत, कन्नडमध्ये पती विरुद्ध पत्नी सामना रंगणार...?
कन्नड, दि.28(डि-24 न्यूज) भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. कन्नडची जागा शिवसेनेला सुटली असल्याने संजना जाधव यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी अजून जाहीर झाली नसली तरीही मिळण्याची दाट शक्यता आहे. उद्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. या मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव, उबाठाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत व संजना जाधव यांच्यात तिरंगी लढतीचे चित्र उद्या स्पष्ट होईल. संजना जाधव यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली तर राज्यात प्रथमच पती विरुद्ध पत्नी हा सामना पाहायला मिळू शकतो. इतिहास बघितला तर जाधव कुटुबाचा वर्चस्व या मतदारसंघात होता परंतु मागिल निवडणुकीत उदयसिंग राजपूत यांनी बाजी मारली होती. हर्षवर्धन जाधव यांचे वडील स्व.रायभान जाधव यांनी 1980 मध्ये काँग्रेस यू, 1990 मध्ये अपक्ष म्हणून, 1995 मध्ये काँग्रेस आय, त्यानंत हर्षवर्धन जाधव यांनी 2009 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे), 2014 मध्ये शिवसेनेकडून या मतदारसंघात प्रतिनिधित्व केले. परंतु या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली. संजना जाधव व हर्षवर्धन जाधव हे 2019 पासून विभक्त आहेत. आता दोन्ही या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. संजना जाधव यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती परंतु हि जागा शिवसेनेला युतीत सुटल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. संजना 2014 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी कला शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. रावसाहेब दानवे यांनी आपले राजकीय वजन वापरून कन्येला उमेदवारी मिळाल्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी दुर करण्याचे आव्हान असणार आहे. पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
What's Your Reaction?