संजय शिरसाट यांच्या कुटुंबाने लाटली सरकारी 10 एकर जमीन..?, जवळपास 7 एकर जागा कवडीमोल भावात खरेदी

 0
संजय शिरसाट यांच्या कुटुंबाने लाटली सरकारी 10 एकर जमीन..?, जवळपास 7 एकर जागा कवडीमोल भावात खरेदी

संजय शिरसाट यांच्या कुटुंबाने लाटली सरकारी 10 एकर जमीन..?, जवळपास 7 एकर जागा कवडीमोल भावात खरेदी केल्याचा आरोप...

पत्रकार परिषदेत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी रजिस्ट्रीचे कागदपत्रे दाखवत केले गंभीर आरोप, हरिजन समाजासाठी राखीव दहा एकर वर्ग-2 ची जागा केली खरेदी, किती पुढा-यांना सरकारी जमीनी लाटल्या याची जिल्हाधिकारी यांनी यादी द्यावी अशी केली मागणी...विवादास्पद तलाठी बागडे व तहसिलदार रमेश मुनलोड यांच्या संगनमताने व्यवहार झाल्याचा आरोप....चिखलफेक आंदोलनाचा इशारा देणा-या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यास इम्तियाज जलिल तयार, पुराव्यांच्या आधारावर केले आरोप असे सांगितले...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) 

एमआयडीसी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत प्लाॅट अलाॅट प्रकरण ताजे असताना सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबाने सरकारी वर्ग-2 ची जमीन वर्ग-1 मध्ये वर्गीकरण करुन हरिजन समाजासाठी राखिव असलेली जमीन लाटल्याचा गंभिर आरोप पत्रकार परिषदेत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे. 

यासोबतच अदालत रोड व साजापूर येथे जवळपास सात एकर जागा कवडीमोल किंमतीत खरेदी केल्याचा रजिस्ट्रीचे कागदपत्रे दाखवत दावा केला आहे. मुलगा सिध्दांत संजय शिरसाट, तुषार संजय शिरसाट व पत्नीच्या नावाने या जमीनी खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

एवढ्या जमीनी खरेदी करण्याचा सपाटा त्यांनी लावला याचा हिशोब कोण देणार असा प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे.

दररोज सकाळी उठून पालकमंत्री महोदय संजय शिरसाट माध्यमांसमोर विविध विषयांवर पत्रकार परिषदेत आरोप प्रत्यारोप करत होते मग मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ते गप्प का...? असा प्रश्न इम्तियाज जलिल यांनी उपस्थित केला आहे.

दलित व एसटी समाजात गरीब लोक नाहीत का ...? बेघर नाहीत का... त्यांना सरकारी जमीन मिळत नाही मग शिरसाठ यांच्या कुटुंबालाच कशी मिळते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून बेघर झालेले अनेक कुटुंबांनी संसार झोपडीत मांडून बसले त्यांना जमीन मिळत नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी सरकारी जमीन लोकप्रतिनिधिंना स्वस्तात मिळवून देत मोकळे होतात हा कोणता न्याय आहे.

जिल्हाधिका-यांना इम्तियाज जलिल यांनी विनंती केली आहे मी खासदार असताना केंद्र सरकारने मंजूर केलेल्या आयुष्यमान रुग्णालयासाठी जमीन मिळत नव्हती मग शिरसाटांना कशी मिळाली याचे उत्तर द्यावे. अशा प्रकारे किती पुढा-यांनी शासकीय जमिनी लाटल्या त्याची यादीच पत्रकार परिषद घेऊन जाहिर करावी नसता अशा प्रकरणात अनेक महसूल अधिकारी अडचणित येतील असा इशारा त्यांनी दिला आहे. सन 2022 मध्ये जेव्हा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार होते त्यांनी साजापूरची वर्ग - 2 ची जमीन वर्ग - 1 करुन देण्यास मान्यता दिली होती परंतु काही प्रमाणिक अधिकारी व्हॅल्यूएशनच्या 50 टक्के रक्कम भरुन सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगी घेतल्यास मंजूरी देण्यास काही प्रमाणिक अधिकारी अडून बसले होते. साजापूर येथील दहा एकर जमिनीची सध्याची मार्केट किंमत 3 कोटी प्रति एकर असताना 1 कोटी 10 लाखात दहा एकर जमीन खरेदी केली. एका माजी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सोबत त्या जागेवर प्लाॅटींग करुन विक्री केले जात आहे. वर्ग-2 च्या जमीनी शोधण्यासाठी एक रॅकेट काम करत असल्याचा आरोप त्यांनी केले आहे. हे प्रकरण घडले त्यावेळी महीला तहसिलदार जमीन वर्गीकरणाची परवानगी देत नसल्याने आठ वेळेस निलंबित झालेले विवादास्पद तलाठी बागडे यांना चार महीन्यांसाठी साजापूर सजासाठी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर रमेश मुनलोड तहसिलदार पदासाठी रुजू झाल्यानंतर वर्ग-2 ची जमीन वर्ग-1 मध्ये करण्यासाठी प्रक्रीया पूर्ण करुन तात्कालिन जिल्हाधिकारी सुनील चव्हान यांच्याकडे पाठवले. त्यानंतर मंजूरी मिळाल्यानंतर रजिस्ट्री करण्यात आली.

दुस-या प्रकरणात सर्वात महाग असलेल्या जालना रोड येथील अदालत रोड, चिंतामणी काॅलनीत 12000 sq fit जमीन 5 कोटी 83 लाख 94 हजार रुपयांत सिध्दांत संजय शिरसाट, तुषार संजय शिरसाट व पत्नीच्या नावाने खरेदी केली. कवडीमोल किंमत 4800 रुपये स्क्वेअर फिटने जमीन त्यांना मिळाली.

तिसरे प्रकरण...

साजापूर येथे डिसेंबर 2024 गट क्रं.34 मध्ये 2 एकर 2 गुंठे जमीन सिध्दांत शिरसाट यांनी 1 कोटी 50 लाखात खरेदी केली. त्याच गटात 2 एकर 2 गुंठे 50 लाखात खरेदी केले. सप्टेंबर 2024 मध्ये साजापूर येथे 2 एकर 2 गुंठे 60 लाखात त्यांच्या पत्नीने खरेदी केले. सर्व आरोप कागदपत्रांच्या आधारावर करत आहे. नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर येथे पंचतारांकीत हाॅटेलचे काम सुरु आहे ते सर्व पुरावे मिळाल्यानंतर बोलेन. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. ते भ्रष्टाचार विरोधी आहेत असे दाखवतात. त्यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश द्यावे नसता त्यांना चष्मा पाठवले जाईल. सिरसाटांच्या सर्व प्रकरणांचे पुरावे मुख्यमंत्री, राज्यपाल, ईडी, सिबिआय, इन्कम टॅक्स विभागाला सादर करणार आहे. मला कोणी खरेदी करु शकत नाही. मी घाबरणारा व्यक्ती नाही. विरोधकांना माझी प्रकरणे बाहेर काढण्याचे सांगितले जात आहे पण त्यांना काही मिळणार नाही असे त्यांनी शेवटी सांगितले. एवढे सर्व घडत असताना सर्व विरोधी पक्ष गप्प का असाही प्रश्न इम्तियाज जलिल यांनी उपस्थित केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow