हर्सुल तलावाच्या सुरक्षेत होणार वाढ, पोहणा-यांची आता खैर नाही, साजिद मौलाना यांच्या मागणीला यश...!
हर्सुल तलावाच्या सुरक्षेत वाढ होणार, पोहणा-यांची आता खैर नाही, साजिद मौलाना यांच्या मागणीला यश...
विरोधीपक्षनेते यांनी काढले आदेश, आयुक्त करणार तलावाची पाहणी...!
हर्सूल तलाव दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग; सुरक्षा उपाययोजनांसाठी निवेदन सादर...
सर्वपक्षीय मुस्लिम आघाडी व नशा मुक्त कृती समितीचा पुढाकार; 24 तास सुरक्षा रक्षक व फेन्सिंगची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) - हर्सूल तलाव येथे 5 एप्रिल रोजी चार युवकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय मुस्लिम आघाडी व नशा मुक्त कृती समिती यांच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला अध्यक्ष साजिद मौलाना यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन आयुक्त अमोल येडगे, महापौर समीर राजूरकर तसेच विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांना देण्यात आले.
निवेदनात हर्सूल तलाव परिसरात वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांकडे लक्ष वेधत तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. तलाव परिसरात सुरक्षिततेची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्यामुळे युवक व लहान मुले अनवधानाने पाण्यात उतरतात आणि अशा दुर्घटना घडतात, अशी गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या :
तलाव परिसरात मजबूत तार फेन्सिंग करणे.
24 तास सुरक्षा रक्षक तैनात करणे.
धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना करणे.
विरोधी पक्षाचे नेते समीर साजिद बिल्डर यांनी प्रशासनाशी चर्चा करत “हर्सूल तलाव परिसरात 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती दिली.
साजिद मौलाना यांची तीव्र भावना :
संस्थापक अध्यक्ष साजिद मौलाना यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की, “हर्सूल तलावात वारंवार निष्पाप जीव जात आहेत, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. प्रशासनाने यापूर्वीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर आज अशा घटना घडल्या नसत्या. आता तरी तात्काळ तार फेन्सिंग व 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या जीवाशी कोणतीही तडजोड होऊ नये, ही आमची ठाम भूमिका आहे.”
राधाकिशन पंडित यांचे आवाहन :
राधाकिशन पंडित यांनी पालकांना उद्देशून सांगितले की, “शहरातील पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. पोहता येत नसलेल्या मुलांनी तलावाजवळ जाणे टाळावे. छोट्या दुर्लक्षामुळे मोठ्या दुर्घटना घडू शकतात, त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.”
शेख सलीम यांची भावनिक आवाहन
प्राचार्य शेख सलीम सर यांनी भावनिक शब्दांत आवाहन करत म्हटले की, “आपल्या डोळ्यासमोर निष्पाप मुलांचे जीव जात आहेत, हे पाहून मन हेलावून जाते. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर अशा घटना पुन्हा घडू शकतात. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन या प्रश्नावर ठोस भूमिका घ्यावी, ही काळाची गरज आहे.”
दरम्यान, महानगरपालिका आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, उद्या स्वतः हर्सूल तलाव परिसराला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाईल आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
यावेळी साजिद मौलाना, शेख सलीम सर, अब्दुल कय्यूम (पत्रकार), राधाकिशन पंडित, हफीज अली, राहुल शिरसाट, सुधाकर चांदणे, शेख मुकरम, शेख युसुफ, सलीम शहा, एम. ए. रऊफ, जलीस अहमद, खिजर सिद्दिकी आदी मान्यवर उपस्थित होते.
हर्सूल तलावातील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेले हे निवेदन प्रशासनाला जाग आणणारे ठरले असून, आता प्रत्यक्षात किती लवकर आणि प्रभावी उपाययोजना होतात, याक
डे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?