वंचित मुस्लिम समाजाच्या हितासाठी नेहमीच तत्पर, औरंगाबाद नावासाठी पाठिंबा - सुजात आंबेडकर

 0
वंचित मुस्लिम समाजाच्या हितासाठी नेहमीच तत्पर, औरंगाबाद नावासाठी पाठिंबा - सुजात आंबेडकर

वंचित मुस्लिम समाजाच्या हितासाठी नेहमीच तत्पर, औरंगाबाद नावासाठी पाठिंबा - सुजात आंबेडकर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) - वंचित घटक व मुस्लिम समाजाचे राजकीय नेतृत्व पुढे आणण्यासाठी नेहमीच एड प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला. राज्यातून 30 मुस्लिम नगरसेवक निवडून आणले. विविध निवडणुकीत प्रतिनिधित्व दिले. अकोला जिल्ह्यात एक मुस्लिम नगराध्यक्ष वंचितने बनवला. फलस्तिन व इराणला पाठिंबा देण्याची हिंमत प्रकाश आंबेडकर यांनी दाखवली. औरंगाबादचे ऐतिहासिक नाव कायम राहावे यासाठी आवाज उठवला. जेव्हा जेव्हा देशात व राज्यात मुस्लिम समाजावर संकट आले तेव्हा रस्त्यावर उतरुन वंचितने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला. अल्पसंख्याक व वंचित समाजाने एकजूट कायम ठेवली तर राजकीय परिस्थिती वेगळी दिसेल व भाईचारा बंधूभाव वाढेल असे प्रतिपादन ईद मिलन कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

कटकट गेट येथील एम्पायरल लाॅन्स येथे सायंकाळी आयोजित ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. या भव्य कार्यक्रमात सर्व धर्मातील धर्मगुरू, काँग्रेस, उबाठा, इस्लाम पार्टी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक, नेते व विविध धर्मातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

याप्रसंगी मुस्लिम धर्मगुरु डॉ.मौलाना रशिद मदनी, भंतेजी संगप्रिया, ख्रीस्ती धर्मगुरू पास्टर संजय भालेराव, मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष जावेद कुरेशी, नगरसेवक तथा गटनेते अफसरखान, अमित भुईगळ, नगरसेविका करुणा मेघानंद जाधव, वंचितचे प्रवक्ते तय्यब जफर यांनी शुभेच्छा देत आपले विचार मांडले. शहराध्यक्ष मतीन पटेल यांनी प्रास्ताविक केले तर अक्रम खान यांनी आभार मानले. त्यानंतर उपस्थितांनी भोजन व शुरखुर्माचा आस्वाद घेतला.

प्रमुख उपस्थिती माजी महापौर तथा उबाठाचे नगरसेवक रशीद मामू, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक नविनसिंग ओबेरॉय, इस्लाम पार्टीचे नेते रफत यारखान, आरेफ हुसेनी, जफर बिल्डर, अबुल आला हाश्मी, जमील खान, गाजी सदाउद्दीन, काँग्रेसचे हामद चाऊस, डॉ.सरताज पठाण, आय लव्ह औरंगाबाद फाऊंडेशनचे अध्यक्ष इरबाज अन्सारी, एसडिपिआयचे नेते सय्यद कलिम, समीर शहा, वंचितचे अरुंधती सिरसाठ, फारुख अहेमद, योगेश बन व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow