हल्दानी शुध्दीकरणास मूक संमती देणारे उत्तराखंड सरकार बरखास्त करा...!

 0
हल्दानी शुध्दीकरणास मूक संमती देणारे उत्तराखंड सरकार बरखास्त करा...!

हल्द्वानी शुद्धीकरणास मूक संमती देणारे उत्तराखंड सरकार बरखास्त करा....!!

संविधान बचाव देश बचाव अभियानचे वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे हे केवळ दलीत असल्या कारणाने, त्यांचे सभास्थळ शुद्ध करण्यात आले. या सर्व शुद्धीकरण प्रकरणात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचेवर तर कठोर कायदेशीर कारवाई करावीच पण, या प्रकारास मूक संमती देणारे, उत्तराखंड सरकार राष्ट्रपतींनी तात्काळ बरखास्त करावे अशी मागणी, संविधान बचाव देश बचाव अभियानचे वतीने करण्यात आली.

या शुद्धीकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी समविचारी संघटनांचे वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी, नहीं चलेगी नहीं चलेगी , छुवा छूत नहीं चलेगी, शुद्धीकरण करणाऱ्यांत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या भाजपा - RSS कार्यकर्त्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा , शुद्धीकरणास मूक संमती देणारे उत्तराखंड सरकार राष्ट्रपतींनी तात्काळ बरखास्त करावे .. इ. घोषणा यावेळी देण्यात आल्या.

हा कार्यक्रम संविधान बचाव देश बचाव अभियान, भारत जोडो अभियान, मराठवाडा लेबर युनियन - महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, सजग महिला समिती व समविचारी संघटनांचे वतीने आयोजित केला होता.

या निदर्शनात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, संविधान बचाव देश बचाव अभियानचे एक संयोजक प्रा.श्रीराम जाधव, खासदार डॉ.कल्याण काळे, वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या बीड येथील प्रा. सुशीला मोराळे, साथी मंगल खिंवसरा, प्रा. तारा जाधव, दलीत अधिकारी आंदोलनाचे कॉ. मधुकर खिल्लारे, श्रमिक मुक्ती दलाचे सुभेदार मेजर सुखदेव बन, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष ऍड. सय्यद अक्रम, डॉ . सरताज पठाण, लाल निशाण पक्षाचे कॉ. भीमराव बनसोड, कॉ. भगवान भोजने, यशवंत ब्रिगेड चे संदीपान नरवटे , मराठवाडा लेबर युनियन चे साथी छगन गवळी, साथी देविदास किर्तीशाही, साथी प्रवीण सरकटे, साथी जगन भोजने, साथी सर्जेराव जाधव, साथी फरीद पठाण, साथी कैलास लोखंडे, साथी निलेश सरदार, इ. ची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नावे तयार केलेले निवेदन एका शिष्टमंडळाद्वारे विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी यांना देण्यात आली.

सध्या जाती व धर्मा मध्ये भांडण लावण्याचे काम सत्तेमधील मंडळी करीत असून, सरकारमधील जबाबदार मंडळी मूक संमती द्वारे बघ्याची भूमिका बजावत असल्याचा यावेळी तीव्र शब्दात अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला.

समाजमन कलूशीत करून, वर्षानुवर्षांपासून अबाधित असलेली सामंजस्याची वीण उसविण्याचा एक कलमी कार्यक्रम सत्तेतील लोकप्रतिनिधी करीत असून, सरकार फक्त बघ्याची भूमिका घेते, त्याचा ही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.

संविधानातील विचार व मूल्ये जतन करणे, समाजात सामंजस्य , एकोपा व भाई चारा वाढविण्यासाठी, सर्व संविधानवादी संस्था - संघटनांचे वतीने शहरात सत्याग्रह करून जेलभरो करण्याचा निर्धार ही या वेळी करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow