अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षार्थींना मारहाण प्रकरणी भाकपाची चौकशीची मागणी

अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षार्थींना मारहाण प्रकरणी भाकपची चौकशीची मागणी ! औरंगाबाद दि. 29(डि-24 न्यूज ) लग्नानंतर नाव बदलले म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिका परिक्षेस बसु न देणाऱ्याची चौकशी करा व परिक्षार्थी विद्यार्थी विद्यार्थिनींना मारहाण करणा-या पोलिस कर्मचारी यांचेवर कार्यवाही करा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिका-यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका पदभरती स्पर्धा परिक्षा घेण्याचे आयबीपीएस या खाजगी संस्थेस नियम धाब्यावर बसवून कंञाट देण्यात आले आहे. सुरवातीपासूनच या कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे शोषण सुरू आहे. या संस्थेने परिक्षा फीस 1000 (एक हजार रुपये )घेण्यात आली. इतकी बक्कळ फीस घेतल्यानंतरही कोणतीही सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत, तरीही नोकरीची गरज असणा-या विद्यार्थी विद्यार्थिनीनी कसबसे स्पर्धेत सहभागी होऊन आपले हॉलटिकीट मिळवले. माञ महिला विद्यार्थिनी यांच्या सन्मानाच्या केवळ बाता करणारे सरकारनी केवळ लग्नानंतर नाव बदलले म्हणून परिक्षेपासुन वंचित ठेवण्याचे आदेश दिले. लग्नानंतर नाव बदलने हा प्रकार माहीत असूनही, त्याचे वेगवेगळे कागदपत्रे दाखवून सुध्दा
विद्यार्थिनींना आयऑन सेंटर, चिकलठाणा सह इतरही परिक्षा सेंटर मध्ये महिला विद्यार्थिनी यांची अडवणूक करण्यात आली. तसेच परिक्षेस बसू द्या अशी विनंती करणा-या परिक्षार्थी यांना पोलिसांनमार्फत मारहाण करण्यात आली. याची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी व परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी सरकारकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदना द्वारे जिल्हाधिका-यांना करण्यात आली आहे. या निवेदनावर अॅड. अभय टाकसाळ, काॅ जॅक्सन फर्णांडीस, काॅ अनिता हिवराळे, काॅ विकास गायकवाड, काॅ माधुरी जमधडे, काॅ . राजु हिवराळे, काॅ रफीक बक्श, यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.
What's Your Reaction?






