अंबादास दानवे व इम्तियाज जलिल साथ साथ...

अंबादास दानवे व इम्तियाज जलिल साथ साथ...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)
मागिल काही दिवसांपासून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल हे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करत आहे परंतू सत्ताधारी पक्षाकडून काही उत्तर मिळत नसल्याने आज दुपारी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे एमआयडिसीत व साजापूर येथे वर्ग-2 ची जमीन कशी नियम डावलून कुटुंबाने हस्तगत केली याचे पुरावे सादर केले.
माजी खासदार श्री. इम्तियाज जलील यांनी आज माझी मातृभूमी प्रतिष्ठान संपर्क कार्यालय, संभाजीनगर येथे भेट घेतली. संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नियम डावलून खरेदी केलेल्या अनेक मालमत्तांबाबत त्यांनी अधिकृत पुराव्यानिशी काही कागदपत्रे माझ्याकडे सुपूर्द केली. आगामी संपन्न होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात याबाबत आवाज उठवेल तसेच राज्यपाल यांना याबाबत माहिती देईल अशी ग्वाही यावेळी दानवेंनी दिली.
What's Your Reaction?






