अटीतटीच्या सामन्यात अब्दुल सत्तार विजयी, उशिरा रात्री दिले प्रमाणपत्र
अटीतटीच्या सामन्यात अब्दुल सत्तार विजयी, उशिरा रात्री दिले प्रमाणपत्र
सिल्लोड, दि.23(डि-24 न्यूज) सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील मतमोजणीत अटीतटीच्या लढतीत अखेर चौथ्यांदा अब्दुल सत्तार यांचा विजयी झाला. मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे सुरेश बनकर व अब्दुल सत्तार यांच्यात विजयासाठी झुंज बघायला मिळाली. कधी अब्दुल सत्तार पुढे तर कधी सुरेश बनकर पुढे असल्याचे चित्र बघून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. अखेर शेवटच्या फेरीत 2420 मतांनी अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली. विजयाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते म्हणून पोलिसांनी बळाचा वापर केला. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ शेख यांनी उशिरा रात्री आठ वाजेच्या दरम्यान आमदार पदाचे प्रमाणपत्र बहाल केले.
अशी मिळाली मते...
शिवसेनेचे अब्दुल सत्तार(विजयी) यांना 137960 मते मिळाली तर दुस-या नंबरवर शिवसेना उबाठा गटाचे सुरेश बनकर यांना 135540 मते मिळाली. बसपाचे संघपाल सोनवणे 1135, वंचितचे बनेखा पठाण 1989, भारतीय ट्रीबल पार्टीचे राजु अफसर तडवी 162, ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅकचे एड शेख उस्मान शेख ताहेर यांना 141, अपक्ष अनिल राठोड 366, अफसर तडवी 78, अरुण चव्हाण 91 मत, अशोक सोनवणे 122, अलाने दादाराव श्रीराम 210, गवली राजू अशोक 166, परिक्षित माधवराव भरगाडे 339, बनकर सुरेश पांडुरंग 907, भास्कर शंकर सरोदे 1570, रफीकखा मुनवरखा पठाण 1612, राजु पांडुरंग साठे 1830, राहुल अंकुश राठोड 2705, विकास भाणूदास नरवडे 340, शरद अण्णा तिगोटे 151, शेख मुख्तार शेख सादीक 267, श्रावण नारायण शिंकर 76, सचिन दादाराव हावळे 528, संदीप एकनाथ सुरडकर 302, नोटा 725 मते मिळाली.
What's Your Reaction?