अनेक वर्षांपासूनची प्रतिक्षा संपली, कन्नड ऑट्रम घाटातील बोगद्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची मंजुरी - डॉ.भागवत कराड
कन्नड औट्रम घाटातील बोगद्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून मंजूरी -
खा. डॉ.भागवत कराड यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- कन्नड औट्रम घाटातील प्रस्तावित बोगद्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अलाईनमेंन्ट अप्रूव्हल कमिटीने मंजूरी दिली असल्याची माहिती माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खा. डॉ.भागवत कराड यांनी शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.
अनेक वर्षांपासून हि मागणी होती आता या मंजूरी मुळे प्रतिक्षा संपली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अलाईनमेंन्ट अप्रूव्हल कमिटी या बोगद्यास मंजूरी दिल्यामुळे औट्रम घाटातील रस्त्याचा मार्ग सुकर झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्ग क्रं. 52 हा 573 किलोमीटरचा महामार्ग असून बीड, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), सोलापूर, धुळे या रस्त्यावर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कन्नडच्या औट्रम घाटातून जड वाहतूक बंद आहे. कन्नड शहरालगत असलेल्या तेलवाडी ते बोधेरे असा 15 किलोमीटर रस्त्याचे काम असून त्यामध्ये साडेपाच किलोमीटर घाटात बोगदा होणार आहे. या बोगद्याची लांबी तीन किलोमीटर राहणार आहे. रस्त्याची अलाईनमेंन्ट बनवण्यासाठी नॅशनल हायवे अथोरिटीने सहा प्रकारचे पर्याय सुचवले होते. त्यापैकी एका पर्यायााल आलाईनमेंन्ट अप्रूव्हल कमिटीने मान्यता दिली आहे. याप्रकल्पासाठी 2 हजार 435 कोटी रुपये खर्च लागणार असल्याचे खा. कराड यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस माजी उपमहापौर भगवान उर्फ बापू घडामोडे, माजी नगरसेवक कचरु घोडके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?