अब्दुल अजिम अजिम इन्कलाब यांचे निधन, मुलीच्या लग्नाच्या दोन दिवस अगोदर पित्याचे निधनाने कुटुंबाला धक्का
 
                                अब्दुल अजिम इन्कलाब यांचे निधन, मुलीच्या लग्नाच्या दोन दिवस अगोदर पित्याचे निधनाने शोककळा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.12(डि-24 न्यूज) समाजसेवक अब्दुल अजिम इन्कलाब(वय 42, राहणार चिकलठाणा हिनानगर) यांचे आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले अशी माहिती डि-24 न्यूजला पत्रकार अजमत पठाण यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले काहि दिवसा अगोदर त्यांना ह्रदयविकाराचा धक्का आला असताना उपचार केले होते. आज उपचारासाठी चिकलठाणा येथील मीनी घाटीत दाखल केले असता प्राणज्योत मावळली. सोशलमिडीयावर हि बातमी व्हायरल झाली आहे. 14 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मुलीचे लग्न आहे आणि लग्नाच्या दोन दिवस अगोदर पित्याचे निधन झाल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे. अब्दुल अजिम इन्कलाब हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर होते. हज हाऊस शहरात बनले पाहिजे त्यासाठी त्यांचे अनमोल योगदान आहे. त्यांनी आमरण उपोषणही केले होते त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हज हाऊस बनवण्यासाठी मंजुरी मिळाली होती. त्यांचा जीन्सी येथील काली मस्जिद येथे बाद नमाज असर नमाज ए जनाजा व दफनविधी तेथील कब्रस्तानात होणार आहे. असे अजमत पठाण यांनी सांगितले. त्यांच्या हिनानगर येथील निवासस्थानी चाहत्यांनी गर्दी केली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ पत्नी, दोन मुले, दोन मुली आहेत.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            