अभिनेत्याची शालेय शिक्षण घेतलेल्या शाळेला भेट, शिक्षकांनी केले स्वागत
 
                                अभिनेत्याची शालेय शिक्षण घेतलेल्या शाळेला भेट, शिक्षकांनी केले स्वागत
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) 24 जानेवारीला मोठ्या परद्यावर प्रदर्शित होणारे कौटुंबिक हिंदी चित्रपट राज-ए-इश्कचे मुख्य अभिनेता असलम खान हे शहरातील जुनी शाळा ज्योती विद्या मंदिरात शालेय शिक्षण झाले. व्यवसायिक सप्ताहानिमित्त त्यांना आपल्या शाळेत अतिथि म्हणून निमंत्रित केले. यामुळे शिक्षकवृंद व शालेय विद्यार्थी भारावून गेले. त्यांचे शिक्षकांकडून जोरदार स्वागत केले. बालपणापासून अभिनय व डान्समध्ये रुची असलेले विद्यार्थी बाॅलिवूडचे अभिनेता बनले व यशाचे उंच शिखर गाठले असल्याने शाळेला अभिमान आहे. ज्या विद्यार्थ्यांना अभिनय व नृत्यामध्ये रुची आहे त्यांनी अभिनेते असलम खान यांचे आदर्श घेत जीवनात प्रगती करावी असे मार्गदर्शन यावेळी अध्यक्षीय भाषण करताना माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीमती सुनंदा चौहान यांनी केले. तर प्राथमिकचे मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता शिवणीकर यांनी मान्यवरांचे स्वागत करत शाळेत भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन करत अभिनेता असलम खान यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अभिनेते असलम खान यांनी आपल्या भाषणात यशासाठी कसे अथक परिश्रम घेतले आपणही शिक्षणात परिश्रम घेतल्याशिवाय प्रगती नाही. कौटुंबिक चित्रपट आपल्या परिवारासह " राज ए इश्क" आवश्य बघावे यामुळे आम्हाला बळ मिळेल असे आवाहन केले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन मनमोकळ्या गप्पा मारल्या. जेष्ठ साहित्यिक व विचारवंत मधुकर अण्णा वैद्य यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर चित्रपटाचे असोशिएट दिग्दर्शक चंद्रशेखर, सतीश के पाटील, स्थानिक कलाकार गणेश घुसळे, कासम मेमन यांची उपस्थिती होती.
सुत्रसंचलन श्रीमती विद्या भगत मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन तायडे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रसाद कायंदे, बागूल मॅडम व आदींनी परिश्रम घेत
 
 
ले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            