अशोक सायन्ना यांच्या हस्ते छावणी श्री गणेश महासंघाच्या "श्री"चीं प्राणप्रतिष्ठापना

 0
अशोक सायन्ना यांच्या हस्ते छावणी श्री गणेश महासंघाच्या "श्री"चीं प्राणप्रतिष्ठापना

माजी महापौर अशोक सायन्ना यांच्या हस्ते छावणी श्री गणेश महासंघाच्या "श्री"चीं प्राणप्रतिष्ठापना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - श्री गणेश चतुर्थी निमित्ताने छावणी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या "श्री"चीं प्रतिष्ठापना बुधवारी (दि.27) माजी महापौर अशोक सायन्ना यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष रखमाजी जाधव, उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल दाभाडे यांची उपस्थिती होती. 

गणेशोत्सवाला 'महाराष्ट्र राज्य उत्सव' म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर, यंदा होणारा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असून छावणी श्री गणेश महासंघ उत्सव समितीद्वारा दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. केशर मॉल समोरील महासंघाच्या माध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित आरती प्रसंगी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रशांत तारगे, संजय गारोल, राहुल यलदी, विजय चौधरी, सनी वाघमारे, ऍड. दीपक ससाणे, युवराज डोंगरे, विनोद साबळे, ऍड.रोहीत सोळसे, राहुल तुपे, अभिजित गंगावणे, महादेव जाधव, आशिष इंगळे, विशाल काकडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow