आंबेडकर जयंती उत्सवात ओवेसी, आंबेडकरी जनतेत उत्साह संचारला...!
 
                                आंबेडकर जयंती उत्सवात ओवेसी, आंबेडकरी जनतेत उत्साह
औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एमआयएमचे सुप्रीमो बॅ. असदोद्दीन ओवेसी यांनी जयंती उत्सव मिरवणुकीत सहभाग घेतल्याने आंबेडकरी जनतेत एकच उत्साह संचारला. पैठणगेट येथे एमआयएमच्या व्यासपीठावर ओवेसींचे रात्री साडेआठ वाजता आगमन झाले त्यावेळी कार्यकर्त्यांनी डिजेच्या तालावर ठेका धरला. मुस्लिम कार्यकर्त्यांनी सुध्दा हातात निळा झेंडा घेत जयंती उत्सवात सहभाग घेतला. यावेळी व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. ओवेसींना अरुण बोर्डे यांनी निळा फेटा बांधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देत स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी आंबेडकरी जनतेला जयंतीच्या शुभेच्छा दिल्या
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            