आदर्श घोटाळा, ठेविदारांचे थाळीनाद आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला...!
आदर्श घोटाळा, 75 ठेविदारांचा मृत्यू नाही हत्या, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, पैसे परत मिळवून देण्यासाठी जलदगतीने पावले उचलावी - इम्तियाज जलिल
'आदर्श'च्या ठेवीदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे विनवणी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले थाळीनाद आंदोलनाने परिसर दणाणून सोडला, पोलिसांचा कडक बंदोबस्त, पाच तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एक रस्ता बंद, तहसीलदार व मंडळ अधिकारी आदर्शच्या मालमत्तांवर सुनावणी घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- 200 कोटींचा आदर्श सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळा तीन वर्षांपूर्वी झाला होता. हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. मागिल तीन वर्षांपासून पैसे परत मिळवून देण्यासाठी कायदेशीर व रस्त्यावर लढाई सुरू आहे. पैसे परत मिळतील या अपेक्षेने 75 गुंतवणूकदारांचा मृत्यू झाला हा मृत्यू नाही तर मी हत्या समजतो. दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तर तहसीलदार व मंडळ अधिकारी आदर्शच्या मालमत्तांची सुनावणी घेण्यास टाळाटाळ करत असल्याने खातेदारांना पैसे परत मिळण्यास विलंब होत आहे तरी जिल्हाधिकारी यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तात्काळ पावले उचलावी नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य थाळीनाद आंदोलनात मार्गदर्शन करताना प्रशासनाला इशारा दिला आहे.
सकाळी 10 वाजेपासून जिल्ह्यातील गुंतवणूकदार घराची भाकरी आणि भाजी घेऊन पावसाळ्यात मोठ्या संख्येने थाळीनाद आंदोलनात सहभागी झाले. यावेळी मोठ्या संख्येने महीला व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाच तास एकीकडचा रस्ता बंद करावा लागला. दुपारी एक वाजता इम्तियाज जलिल यांचे आगमन झाले. यानंतर आंदोलनांमध्ये उत्साह वाढला. इम्तियाज जलिल यांनी हातात थाळी घेऊन आंदोलकांसोबत थाळीनाद केला.
जिल्हाधिकारी यांना इम्तियाज जलिल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ठेविदारांनी आपल्या व्यथा मांडली. "साहेब, आमच्या मुलींचे लग्न राहिले आहे", ऑपरेशन करायचेय मात्र हाती पैसे नाही, पैसे नसल्याने मुलेही विचारत नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे...? आम्हाला आमचे हक्काचे पैसे परत मिळवून द्या, अशी विनवणी आदर्श पतसंस्थेत ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत दोनशे कोटींचा घोटाळा झाल्यानंतर ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. अद्याप मोठया ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. अनेकांच्या आयुष्यभराची मिळकत पतसंस्थेत अडकल्या आहेत. काहींनी नोकरीतुन बचत केलेली रक्कम तर काहींनी शेती विकून पैसे पतसंस्थेत ठेवले. मात्र पतसंस्था बुडाली आणि त्या सर्वांचे पैसेही बुडीत खात्यात जमा झाले. सन 2022 मध्ये झालेल्या या घोटाळ्यासाठी अद्याप ठेवीदारांचा लढा सुरु आहे. यात शासन दिरंगाई करत असल्याच्या कारणावरून शासनाला जागे करण्यासाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. यावेळी ठेवीदारांसह शहरवासीदेखील सहभागी झाले होते.
सकाळी जिल्हाभरातील ठेवीदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले. दुपारपर्यंत हे आंदोलन सुरु होते. यातच पाऊस आला. सर्वजण भिजले तरी आंदोलन सुरूच होते. हजारो कुटुंबांच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई परत मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवली.
इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपल्या ठेवी परत मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्यापैकी 75 ठेवीदारांचा आजपर्यंत जीव गेलेला आहे. हा जीव गेला नाही घेतला आहे असे मी मानतो. दोषींवर कारवाई करावी या ठेवी मिळेपर्यंत आपले आंदोलन सुरु राहणार आहे. आज अजिंठा बँक, मलकापूर बँक, कुटे ग्रुप घोटाळ्यातील संचालक आज बाहेर आरामात जगत आहेत. मात्र आदर्शच्या संचालकाला आपण आतापर्यंत बाहेर येऊ दिलेले नाही. त्यांनी मोठमोठे वकील लावले मात्र त्यांना बाहेर येता आलेले नाही. सर्व ठेवीदारांचे पैसे दिल्याशिवाय त्यांना बाहेर येऊ देणार नसल्याचे जलील यांनी ठेवीदारांना आश्वासित केले.
दरम्यान, शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी ठेवीदारांनी आपल्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या. यावर शासनापर्यंत ठेवीदारांचे म्हणणे सादर करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळा
ला दिले.
What's Your Reaction?