आदर्श घोटाळ्याची लढाई लढणार इम्तियाज जलील, ठेविदारांच्या डोळ्यात अश्रू अनावर...!
 
                                आदर्श घोटाळ्याची लढाई लढणार इम्तियाज जलील, ठेविदारांच्या डोळ्यात अश्रू अनावर...!
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) खासदार असताना इम्तियाज जलील यांनी आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यातील गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली अक्रामक आंदोलन उभे केले. प्रशासनाने कारवाई केली परंतु आतापर्यंत पैसे परत मिळाले नाही अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुक आली आणि इम्तियाज जलील यांचा पराभव झाला. आदर्शचे ठेविदारांनी आज दुपारी इम्तियाज जलील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर आले. यावेळी इम्तियाज जलील यांनी त्यांना आश्वासन दिले अजून लढाई संपलेली नाही धीर धरा पुन्हा तीव्र आंदोलन करुन पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी गप्प बसणार नाही तुमच्या हक्काचे पैसे मिळवून देणार. यावेळी 42 शाखांचे ठेवीदार, जेष्ठ महीलांना या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे दु:ख सहन न झाल्याने डोळे पाणावले. गंगापूर, नाचनवेल, सारोळा, लिंबाजी चिंचोली, आळंद, सिल्लोड, फर्दापूर, करमाड, बिडकीन, वाळूज, पंढरपूर, बजाजनगर, गल्लेबोरगाव, हतनूर, पळसी, औरंगाबाद शहर येथील शेकडो ठेविदारांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली
 
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            