दिव्यांगांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, लाभार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याची मागणी...!
 
                                दिव्यांगांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, लाभार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याचा मागणी...!
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) मनपा समोर दिव्यांग आपल्या हक्काच्या पाच टक्के निधी खात्यावर जमा होत नाही या संदर्भात मनपा समोर गेल्या सहा दिवसापासून उपोषण करत आहे. यावेळी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली महानगर प्रमुख रेणुकादास वैद्य यांना कळाले. त्यांनी ताबडतोब उपोषणस्थळी जाऊन शिवसेना आपल्या उपोषणात सहभागी आहे असे सांगितले. तसेच प्रशासनाला लवकरात लवकर दिव्यांगांना मिळणारा पाच टक्के निधी उपलब्ध करून द्यावा अशा सूचना आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नसता शिवसेना उपोषणाला बसेल असे सांगितले त्यावेळेस दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष शाहूराज चित्ते, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, अल्पसंख्यांक शहर संघटक अखिल शेख, युवा सेना उपशहर अधिकारी शुभम साळवे, शेख शकील ,प्रशांत वाघमारे ,विजय जिनवाल, शेख मुनीर सय्यद कलीम ,मोसीन खान कलीम, खान मुदस्सर , मुदस्सर अंसारी, शेख वसीम, संजय कूड़े, खलील यार खान ,कृष्णा कुमावत, मोहम्मद चौश ,अजय थोर, सोहेल शेख, शाहेदा शेख फरीदा, मंसूरी शाहीन बाज़ी ,रेशमा पठान ,शेख शारूख शेख अजीम, रूपनारायण नागरे, संजय पंढुरे, वहाब चौष ,माजिद मिर्जा ,अजय करके, प्रभाकर जगताप ,दत्तू बखड़े, नारायण गायकवाड आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            