आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी, राष्ट्रवादी रस्त्यावर, घंटा वाजवून केला कार्यवाईचा निषेध

 0
आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी, राष्ट्रवादी रस्त्यावर, घंटा वाजवून केला कार्यवाईचा निषेध

आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी, राष्ट्रवादी रस्त्यावर, केला कार्यवाईचा निषेध

औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) आज सकाळपासून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची मुंबईत ईडीच्या वतीने चौकशी सुरू आहे.

सरकार जनसामान्यांचे प्रश्न न सोडवता सूडबुद्धीने कार्यवाई करत आहे. जे लोक भाजपासोबत गेले त्यांची चौकशी न करता जे विरोधात आहे त्यांची चौकशी केली जात आहे या कार्यवाहीचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी घंटानाद आंदोलन करत सरकारचा निषेध केला. भाजपचे सरकार लोकशाहीला घातक आहे तर हुकुमशाही सारखे वागत आहे. जनसामान्यांचे प्रश्न जैसे थे आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, महीला सुरक्षा, महागाई सारखे अनेक समस्या समोर असताना सरकारी एजंसीचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केले जात आहे. आम्ही लढत राहु, शरद पवार यांच्या सोबत राहुन भाजपाचा मुकाबला करणार, रोहीत पवार कुटुंब ईडीच्या संकटातून बाहेर पडतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त करत अक्रामक आंदोलन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील व शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी वेगवेगळे निवेदन दिले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे जनतेचे अनेक प्रश्न व समस्या आहे ते सरकारने सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात 22 मागणी केली आहे.

या आंदोलनात घंटा वाजवून घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, अभिजित देशमुख, मुश्ताक अहमद, सुधाकर सोनवणे, इलियास किरमानी, प्रा.सलिम शेख, विलास चव्हाण, विश्वजीत चव्हाण, नविन ओबेरॉय, मुन्नाभाई, शेख इरफान, अश्रफ पठाण, 

विनाताई खरे, छायाताई जंगले, सलमा बानो, वैशाली चौधरी, संध्या सिरसाट, मंजुषा पवार, कविता होळकर, झैबुन्निसा मुकादम, अलका गिरी, कैसर पठाण, मालती निकम, राजेश बापू सोळंके, सुरेश पाटील गावंडे, मोतीलाल जगताप, प्रसन्न पाटील, वाल्मिक भाऊ सिरसाट, राजेश पवार, प्रशांत जगताप, डॉ.ज्ञानेश्वर निळ, सोमिनाथ शिराणे, एम.डि.इंगळे, भुषण तांबे, सुशील बोर्डे व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow