आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना सरकार कोठे आहे दिसत नाही - आदित्य ठाकरे
 
                                आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना सरकार कोठे आहे दिसत नाही - आदित्य ठाकरे
हाफकीन्स रद्द करुन प्राधिकरण स्थापन केले मग औषधी खरेदीसाठी विलंब का...? कोरोना काळात याच आरोग्य यंत्रणेकडे जवाबदारी होती त्यांनी ती चोखपणे पाळली त्यांना कशाला दोष देता, टास्क फोर्स कोठे आहे या सरकारने बंद केले, निष्पापापांचा बळी जात असताना सरकारला लाज वाटत नाही आरोग्य मंत्री जवाबदारी झटकत आहे राजीनामाही देत नाही...
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) औषधांचा तुटवडा, अपुरे मनुष्यबळ व पायाभूत सुविधा मिळत नसल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत असताना सरकार कोठे आहे दिसत नाही आरोग्य मंत्री म्हणत आहे हि माझी जवाबदारी नाही, सरकार राजीनामा देणार नाहीत मग लाज कशी वाटत नाही जेव्हा उपचारासाठी उपाययोजना नसताना निष्पापाप रुग्णांचे बळी जात आहे. सरकारने नांदेड व औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात येऊन भेट सुद्धा घेतली नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोठे आहे दिसत नाही असा प्रश्न उपस्थित करत आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
घाटी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन अधिष्ठाता यांच्याशी सविस्तर चर्चा केली. काय अडचणी आहेत ते समजून घेतले. रुग्णांच्या मृत्यूला अधिष्ठाता व डॉक्टरांना दोषी ठरवणे बरोबर नाही. यामध्ये दोषी सरकार आहे. शिवसेना जुलै पासून मुंबईत केएमके रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्यावे यासाठी आंदोलन केले. अगोदरच सरकारने पाऊल उचलले असते तर या घटना घडली नसती. हाफकीन्स रद्द करुन प्राधिकरण स्थापन केले मग औषधी खरेदीसाठी विलंब का लागत आहे. अपुरे मनुष्यबळ व औषधी खरेदी वर वर्षानुवर्षे उशीर झाला आहे. कोरोना काळात हेच अधिष्ठाता व डॉक्टरांनी जीव वाचवले जगाने यांचे कौतुक केले मग आताच असे काय घडले. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थापन केलेले टास्क फोर्स बंद केले त्यामध्ये जिल्हाधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी होते. आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही असे त्यावेळी काम झाले मग असे आता का होत नाही. संयुक्तिक निर्णय घेत जास्त प्रमाणात अधिष्ठाता यांना खरेदीसाठी अधिकार दिले तर परिस्थिती बदलेल. याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
यानंतर नांदेड व नागपूर कडे ते रवाना झाले.
याप्रसंगी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            