आलमगीर काॅलनीत काँग्रेसचे उमेदवार शेख सलिम युसुफ यांचे जंगी स्वागत...
आलमगिर काॅलनीत काँग्रेसचे उमेदवार सलिम शेख यांचे स्वागत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 3 चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शेख सलिम युसुफ यांचा आलमगीर काॅलनीत हयात फॅमिलीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. या निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतांनी निवडून देण्याचा ठाम निर्णय येथील रहिवासींनी घेतला. शेख सलिम युसुफ यांनी परिसरातील समस्या जाणून घेतल्या. नगरसेवक आणल्यानंतर सर्व नागरी समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांमध्ये काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची लोकप्रियता वाढली आहे असे प्रचारात मिळत असलेल्या प्रतिसादातून दिसून येत आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी शेख सलिम व पॅनलमधील तीन उमेदवारांना प्रभागातील विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती युनुस हयात खान, मजहर हयात हयात खान, सादीक खान, खालेद खान, तारेक खान, हारीस खान, फैज अलि सय्यद, फहाद मोहंमदी, अथर खान, इलियास शेख, दिलदारुद्दीन, अल्ताफ बागवान, आमेर बागवान, अखिल बियाबानी आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?