इंधन महाग व टंचाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केले आंदोलन...
इंधन महाग व टंचाई विरोधात राष्ट्रवादीने केले आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - महागाई, इंधनटंचाई आणि सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी सरकारच्या विरोधात या घोषणा देण्यात आल्या...
"झोपा काढा झोपा काढा केंद्र सरकार झोपा काढा …!"
"झोपलेल्या सरकारचं करायचं काय खाली डोके वर पाय...!"
"निष्क्रिय सरकार हटाव देश बचाव...!"
"बहुत हुई महंगाई की मार भगावो यह सरकार...!"
सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे. याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महागाईच्या धोरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, शहर कार्याध्यक्ष फारुख शेख, अश्फाक खान,आनंद खोडके, सुभाष जाधव, लतीफ कुरेशी, शाहरुख मोहम्मद, तारेख पठाण,अतिश खरात, सय्यद जुनेद, मुशू पठाण, इरफान पठाण, अंकुश जाधव, निखिल छाजेड, रविराज बोचरे, मोमीन शेख, शब्बू शेख, सुहास उगले, पांडुरंग काळे,नवनाथ बिडवे, संतोष पाटील, बाबासाहेब राठोड, बिजून राऊत,शेहबाज शेख, मनोज घोरपडे,अनिल पाटील व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?