शस्त्र बाळगण्यास मनाई....!

 0
शस्त्र बाळगण्यास मनाई....!

शस्त्र बाळगण्यास मनाई...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक आचारंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या कालावधीत निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास निर्बंध लागू केलेले आहेत. त्यानुसार भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती ( दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, बॅंक सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी) वगळून अन्य व्यक्तिंना परवाना दिलेले शस्त्र बाळगण्यास मनाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. याबाबत कुणास आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात छाननी समिती समोर लेखी अर्ज सादर करुन आपले म्हणणे मांडावे, असे कळविण्यात आले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अन्वये कार्यवाही करण्यात येईल . हे आदेश दि.25 नोव्हेंबर पर्यंत अंमलात असतील असे कळविण्यात आले आहे.

०००००

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow