इम्तियाज जलिल यांच्या "मन्नत"ची सुरक्षा वाढवली, चिखलफेक आंदोलन होणार का...?
 
                                 
इम्तियाज जलिल यांच्या "मन्नत"ची सुरक्षा वाढवली, चिखलफेक आंदोलन होणार का...?
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्या "मन्नत" निवासस्थानाची पोलिसांनी सुरक्षा सकाळपासून वाढवली आहे. सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी व पोलिस अधिकारी यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे कोणी येणार नाही यासाठी येणारे सर्व मार्गांवर पोलिस तैनात केले आहे. येणा-या जाणा-यांची तपासणी करुन वाहने सोडली जात आहे.
इम्तियाज जलिल यांच्या निवासस्थानावर मंत्री संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते चिखलफेक आंदोलन करण्यात येणार असल्याने एमआयएमचे कार्यकर्ते सुध्दा येथे ठाण मांडून बसले आहे. इम्तियाज जलिल यांनी त्या कार्यकर्त्यांना थेट इशारा दिला आहे मी घाबरणारा व्यक्ती नाही त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे तर करु शकता परंतु चिखल व शेण घरावर फेकण्याची भाषा करत असतील तर जशास तसे उत्तर मिळेल. मंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबाला कसे नियम तोडून एमआयडीसीत प्लाॅट अलाॅट केला यांचे पुरावे अधिका-यांना दिले आहे. हे आरोप बिनबुडाचे नाही पुरावे आहे माझ्याकडे. कागदपत्र्यांमध्ये घोळ करण्याचा प्रयत्न केला तर आणखी अनेक प्रकरणे काही दिवसांत बाहेर काढले जाईल. मुख्यमंत्र्यांनी काही कार्यवाही केली नाही तर ती कागदपळत्रे बघण्यासाठी एक चष्मा पाठवण्याचा इशारा इम्तियाज जलिल यांनी दिला आहे. 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            