इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकर नगरात आंदोलन

 0
इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकर नगरात आंदोलन

इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकर नगरात आंदोलन

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) औरंगाबाद पूर्वचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आंबेडकर नगर येथील नेत्यांवर पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानंतर रात्री आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरुन जोडेमारो आंदोलन केले. 

आंबेडकर नगर येथे महेंद्र सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी अक्रामक आंदोलन करत इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. इम्तियाज जलील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत काल झालेल्या निवडणुकीत पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. जालिंदर शेंडगे व महेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महेंद्र सोनवणे यांनी इम्तियाज जलील यांनी दलित महीला भगिनिंचे अपमान केला आहे त्यांच्या विरोधात अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे. त्यांना 2019 मध्ये आंबेडकर नगर येथील महीला भगिनींनी मते देऊन निवडून आणले होते. शिकलेले असताना बिनबुडाचे आरोप ते करत आहे. एड प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे ते निवडून आले होते ते आज विसरले आहेत व दलित नेते व महीला भगिनी यांच्यावर ते आरोप करत आहे त्यांना दलित समाज रस्त्यावर फिरु देणार नाही असा अक्रामक पवित्रा समाजाने घेतला असल्याचे यावेळी माध्यमांना सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow