इस्लाम पार्टीचे शहरात पहीले आंदोलन पाण्यासाठी, रिकामे हंडे घेऊन महीला रस्त्यावर...!
इस्लाम पार्टीचे शहरात पहीले आंदोलन पाण्यासाठी, रिकामे हंडे घेऊन महीला रस्त्यावर...! पोलिसांचा कडक बंदोबस्त...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) - मालेगाव महानगरपालिकेत सत्ता मिळाल्यानंतर इस्लाम पार्टीने(Indian Secular Largest Assembly Of Maharashtra) शहरात जनतेचे ज्वलंत प्रश्न उपस्थित करत पाय रोवायला सुरुवात केली आहे. आज शहरात पहीले आंदोलन पाणी प्रश्नावर करत शहरवासीयांचे ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न इस्लाम पार्टीच्या नेत्यांनी केला. शेकडो महीलांनी हातात रिकामे हंडे घेऊन हंडा मोर्चात सहभागी होऊन दोन दिवसाआड पाणी मिळालेच पाहिजे, पाणीपट्टी कमी करून 1200 रुपये करण्याची मागणी केली. सायंकाळी 4 वाजता महापालिकेच्या मुख्यालयासमोर हंडा मोर्चा काढून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रसंगी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी गळ्यात इस्लाम पार्टीचे रुमाल व हातात झेंडे घेऊन प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. प्रमुख नेत्यांनी मनपा आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामात दिरंगाई होत असल्याने दहा ते बारा दिवसाआड पाणी मिळत आहे. हे पाणी दोन दिवसाआड नळाला आले पाहिजे अशी मागणी केली. शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पूर्ण शहरामध्ये पाण्याची पाइपलाइन बसवण्याचे काम निविदेप्रमाणे देण्यात आले आहे. शहरामध्ये या योजनेअंतर्गत नवीन पाण्याची 54 टाकी बणवण्याची अट असून आतापर्यंत 10 ते 12 टाक्या बसवण्यात आले आहेत. पाण्याची पाइपलाइन शहरात 2 हजार किलो मीटर टाकायची आहे यापैकी आतापर्यंत 1100 ते 1200 किलो मीटर पाइपलाइन टाकली आहे काम संथ गतीने सुरू आहे. जुन्या शहरात 700 मीटर पाइपलाइन टाकणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अल्पसंख्याक व दलित वस्ती व स्लम भागात पाण्याची लाईन लवकर टाकावी व दरवर्षी 1200 रुपये पाणीपट्टी वसूल करावी अशी मागणी इस्लाम पार्टीच्या निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी इस्लाम पार्टीचे नेते कलिम कुरेशी, रफत यारखान, अबुल हसन अली हाश्मी, आरेफ हुसेनी, जफर बिल्डर, सलिम पटेल बोरगांवकर, गाजी सदाउद्दीन, शकीला पठाण, सलमा बानो व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?