ईव्हीएम हटावो, बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी उद्यापासून आमरण उपोषण
ईव्हीएम हटावो, बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) ईव्हीएम हटावो बॅलेट पेपर वर निवडणुका घ्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्याच्या मागणीसाठी दिनांक 28 नोव्हेंबर 2023, उद्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अनंत केरबाजी भवरे यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले मी एक सर्वसामान्य भारतीय नागरिक असून या नात्याने एक घटनात्मक नैतिक कर्तव्याने भारतीय संविधान अनुच्छेद क्रमांक 19(का)च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार मला जो मुलभूत अधिकार दिलेला आहे. त्यानुसार मी आपल्याला सर्व देशवासीयांच्या वतीने भारत निवडणूक आयोगाला हि मागणी केली आहे. देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम आणि व्हि.व्हि.पॅट न घेता बॅलेट पेपर वर घ्यावे अशी मागणी केली आहे.
भारतीय जनतेचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय या लोकशाहीच्या मुलभूत संकल्पनांचा आविष्कार करण्याची संधी हजारो वर्षानंतर जनतेला आणि लोकशाहीच्या सर्वच जबाबदार घटकांना मिळाली आणि आमच्या देशाने 26 जानेवारी 1950 पासून आणि त्यानंतर 1952 पासून पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेऊन देशाने लोकशाहीच्या प्रथमच प्रवासाला सुरुवात केली. काही वर्षांनी या देशाला साधारणपणे 30 ते 40 वर्षानंतर लोकशाहीतील या मूळ संकल्पना अदृश्य होताना दिसू लागले. त्यामुळे देशाला असंख्य व्याधीने त्रस्त करण्याचे काम येथील लोकशाहीतील जबाबदार घटकांनी केले.
भारताचे संविधान कितीही पवित्र व चांगले असले तरी देश चालवणारे बरोबर नसतील तर घटनेचा देशाला काहीही उपयोग होणार नाही असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते.
जगातील सर्वच लोकशाहीवादी इतर देशांनी ज्यांनी ईव्हीएम बनवले त्या देशांनी सुध्दा ईव्हीएम न स्वीकारता बॅलेट पेपरवरच निवडणूका घेत आहेत.
बॅलेट पेपरवरच निवडणूका घ्यावेत हि भारतीय जनतेची मागणी आहे.
चंद्रयान -3 हे अभियान पृथ्वीवरून योग्य दिशानिर्देश देऊन त्या यंत्राला नियंत्रणात आणू शकतो तर या ईव्हीएम यंत्राला नियंत्रणात आणून हॅक करून विशिष्ट राजकीय पक्षांना लाभ मिळू शकतो हि आशंका सर्व भारतीय जनतेला आल्यामुळे एका यंत्रात जनतेचे सार्वभौमत्व बंदीस्त होऊ शकत नाही. हि भीती जनतेत निर्माण झाल्यामुळे हि मागणी करत आहोत असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. निवेदनात पाच प्रमुख मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. यावेळी उपोषणकर्ते अनंत केरबाजी भवरे, मच्छिंद्र गोर्डे, संजय निंबाळकर उपस्थित होते.
What's Your Reaction?