उघड्यावर मांस विक्रीला बंदी, उपाययोजना अपुरी, बक्कर कसाब संघटनेचे निवेदन
उघड्यावर मांस विक्रीला बंदी, उपाययोजना अपुरी, बक्कर कसाब संघटनेचे निवेदन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) शहरात उघड्यावर मांस विक्रीला बंदी असल्याने महापालिकेच्या वतीने अपुरी उपाययोजना असताना व्यवसायिकांना त्रास देत असल्याचे तक्रारी येत आहेत.
मागिल आठ दिवसांपून वर्तमानपत्रात महापालिकेच्या वतीने जाहिरात व बातम्या दिल्या जात आहे. नाहरकत प्रमाणपत्र, उघड्यावर मांस विक्री, मांस विक्री परवाना परवाना नुतनीकरण या बाबतीत महानगरपालिकेकडून दंडामध्ये वाढ करण्यात आली असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शहरात उघड्यावर मांस विक्री थांबवण्यासाठी 13 ठिकाणी चिकन मटण मार्केट बांधण्याचे ठरले असून आज रोजी पर्यंत एकही मटण मार्केटचे काम सुरू झालेले नाही. व्यवसायिकांना सुविधा न देता महानगरपालिकेचे काही अधिकारी जाणून बूजून फक्त व्यवसायिकांना त्रास व्हावा या हेतूनेच अशी जाहिरात प्रसिद्ध करुन वरिष्ठांना चुकीची माहिती देत आहे. 13 ठिकाणी मटण, चिकन मार्केट झाल्यानंतर एकही मांस विक्रीता उघड्यावर मांस विक्री करणार नाही. विना परवाना राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. व्यवसायिकांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्याची महापालिकेची जवाबदारी आहे. सुविधा उपलब्ध करून दिल्यास महापालिकेचे उत्पन्न वाढेल. मार्केटचे काम लवकर सुरू करावे व नियम व दंड तात्काळ रद्द करावे अशी मागणी निवेदनाद्वारे मनपा प्रशासकांना महाराष्ट्र प्रदेश(बक्कर कसाब) खाटीक संघटनेने केली आहे. यावेळी समीर कुरेशी, हाजी इरफान कुरेशी, अल्ताफ कुरेशी यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?