उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणामुळे सुमारे 2 टिएमसी पाण्याची बचत - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 0
उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणामुळे सुमारे 2 टिएमसी पाण्याची बचत - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणामुळे सुमारे दोन टीएमसी पाण्याची बचत – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

मराठवाड्यातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाययोजनांसाठी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 2 (डि-24 न्यूज) : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी वितरण करताना सुमारे 40 टक्के पाणीहानी होत आहे. उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणामुळे सुमारे दोन टीएमसी पाण्याची बचत होत असून, त्याचप्रमाणे डाव्या कालव्यातील पाणीहानी कमी करण्यासाठी सुधारणा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करून सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात कालवा सल्लागार समित्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा, कालव्यांमधील पाणी वितरण, पाणीहानी कमी करण्याच्या उपाययोजना आणि मराठवाड्यातील दीर्घकालीन पाणी नियोजनाबाबत माहिती दिली.

जायकवाडी प्रकल्पात सध्या सुमारे 58 टीएमसी जलसाठा असल्याची माहिती डॉ. विखे पाटील यांनी दिली. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचनासाठी पाणी देण्यात आले आहे. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येत असून, सिंचनासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.

कालव्यांमधून पाणी वितरण करताना शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी वितरणात शिस्त राखणे आणि पाणीहानी कमी करणे महत्त्वाचे आहे. कालव्याच्या शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याच्या नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रकल्पांसाठी पाण्याची उपलब्धता, सर्वेक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने नियोजन सुरू असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

केवळ अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणे पुरेसे नसून त्या पाण्याच्या साठवणुकीसाठी आणि संबंधित भागांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभारणेही महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने विविध प्रकल्पांचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील दुष्काळी भागांना शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे. वैनगंगा-नळगंगा यांसारख्या नदीजोड प्रकल्पांचाही त्यांनी यावेळी संदर्भ दिला.

उपलब्ध जलसंपत्तीचे योग्य नियोजन, कालव्यांमधील पाणीहानी कमी करणे आणि अतिरिक्त पाण्याचे स्रोत निर्माण करणे या उपाययोजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागांसाठी दीर्घकालीन पाणी उपलब्धता निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे डॉ. विखे पाटीउजव्लय यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow