उद्यापासून रास दांडीयाचा जल्लोष, मान्यवरांच्या उपस्थितीत होणार दुर्गा मातेचे पुजन- प्रमोद राठोड

 0
उद्यापासून रास दांडीयाचा जल्लोष, मान्यवरांच्या उपस्थितीत होणार दुर्गा मातेचे पुजन- प्रमोद राठोड

स्वाभिमान क्रीडा मंडळ आयोजित रास दांडियाची तयारी पुर्ण ; उद्या पासून तरुणाईच्या दांडियाचा जल्लोष

पारंपारिक वेशभूषा असणाऱ्यानाच असेल प्रवेश

मान्यवरांच्या उपस्थितीत होणार दुर्गा मातेचे पुजन ; संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) गेली आठ वर्ष अखंडरित्या शहरातील देवीभक्त तसेच दांडियापटूंच्या सहभागाने यशस्वीरित्या स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित एन-3 रास दांडिया प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार लोकसहभागाने साजरा करणार असल्याची माहिती स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. शिवछत्रपती महाविद्यालया समोरील गरबा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या रास दांडियाची सुरुवात गुरुवारी (दि.3) दुर्गा पुजनाने मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. याप्रसंगी स्वाभिमान क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष धनंजय अतकरे, सचिव विशाल दाभाडे, नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष समीर लोखंडे, कार्याध्यक्ष राहुल बोरोले, सरचिटणीस जीवन रौंदळ, उपाध्यक्ष अभिजित खरात, निनाद खोचे, सचिव विक्रांत पंजाबी, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांची उपस्थिती राहणार आहे. 

याविषयी अधिक माहिती देतांना संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड म्हणाले की, नवरात्र उत्सव साजरा करण्याचे हे नववे वर्ष असून गेल्या सात वर्षापासून एन-3 रास दांडियाचे उत्कृष्टरित्या आयोजन करण्यात येत आहे. यामुळे हा रास दांडिया मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेला आहे. तर उपाध्यक्ष धनंजय अतकरे म्हणाले की, महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जोपासत दांडियाप्रेमींसाठी या रास दांडियाचे आम्ही सातत्याने यशस्वीरित्या आयोजन करीत आहोत. त्यामुळे महिला, तरुण, तरुणींचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संदीप काळे यांची अद्ययावत ध्वनी व्यवस्था तसेच मनोज बोरा यांच्या सिध्दी डेकोरेटर्सच्या वतीने करण्यात आलेली आकर्षक स्टेज व्यवस्था, प्रदीप राठोड यांचे कायक्रम व्यवस्थापन हे या रास दांडियाचे मुख्य वैशिष्ट असून 9 दिवस या उत्सवात नियमित खेळणार्यान दांडियापटूंना, विशेष वेशभुषा, बेस्ट स्टॅमिना, बेस्ट परफॉर्मर, उत्कृष्ट दांडियापटू, बेस्ट कपलची निवड परिक्षकांद्वारे करुन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात गायकांच्या गीत संगीताच्या तालावर तरुणाईला दांडिया खेळण्याचा आनंद लुटता येणार आहे. तसेच चित्रपट, मालिका तसेच गीत संगीत क्रीडा क्षेत्रातील सेलीब्रेटीची उपस्थिती हे या नवरात्र उत्सवाचे विशेष आकर्षण राहणार आहे. नवरात्रउत्सवात पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने महिला व मुलींची विशेष सुरक्षाव्यवस्था करण्यात आली असून प्रवेशीकेद्वारे दांडियापटूंना पारंपारिक वेश भूषेतच या एन-3 रास दांडियात सहभागी होता येणार आहे. रास दांडिया खेळणार्याच तसेच याठिकाणी भेट देणा-या प्रत्येकांसाठी खाद्य दालनांची व्यवस्था करण्यात आली असून नऊ दिवस या चालणा-या पारंपारिक रास दांडियात सहभागी होऊन रास दांडिया खेळण्याचे आवाहन स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, सचिव विशाल दाभाडे यांच्यासह नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष समीर लोखंडे, कार्याध्यक्ष राहुल बोरोले, सरचिटणीस जीवन रौंदळ, उपाध्यक्ष अभिजित खरात, निनाद खोचे, सचिव विक्रांत पंजाबी, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी केले आहे. या नवरात्र उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अमरसिंह ठाकुर, प्रदिप राठोड, गीताराम कांबळे, रऊफ पठाण, अमान पटेल, शिराज कुरेशी गोरख राठोड, पंकज परदेशी अनिकेत थारयानी, गिरीश बांगर, नितेश टेकाळे, प्रशांत वावरे, विशाल जाधव, हरी जाधव, नितीन शेजूळ, संग्राम अतकरे, आशिष मार्गे, अरविंद सोनवणे, संतोष नागवे, संतोष उगलमुगले, योगेश गायसमुद्रे, प्रसाद महाजन, दिनेश जायभाये, अविराज चव्हाण, विशाल काकडे, देवर्षी पगार, यश काळे, विजय काळे, राहुल पवार, हे पुढाकार घेत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow