उध्दव सेनेला गळती, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात...!
उध्दव सेनेला गळती, अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपात...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याने उध्दव सेनेला गळती लागल्याचे दिसून येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी त्यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक उर्जा विभागाचे मंत्री अतुल सावे नेतृत्वाखाल ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, भाजपाचे शहराध्यक्ष शिरिष बारोळकर, संजय कौडगे आदी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख शिवा लुगांरे, माजी नगरसेवक प्रसाद अत्तरदे, ज्येष्ठ शिवसैनिक राजु खरे, विभागप्रमुख सुगाम देहाडे, विभागप्रमुख नागनाथ स्वामी, शाखाप्रमुख रोहिदास पवार, उपविभाग प्रमुख प्रकाश हांडे, उपशाखा प्रमुख, शिवशंकर स्वामी, गटप्रमुख मनोहर विखणकर, अजिंक्य देसाई, पंतु जाधव, मनोज नर्बदे, अनंत वराडे, वसंत देशमुख, सुभाष नेमाने, रमेश गल्हाटे, गौतम भारस्कर, विठ्ठल सोनावणे, तुकाराम घोडजकर, रवी बनकर, युवासेना उपशहरप्रमुख रोहित स्वामी, उपशाखाप्रमुख राहुल पाटील, उपशाखा प्रमुख, योगेश चौधरी, गट प्रमुख, बाबू स्वामी, आकाश बिडवे, निखिल पडूळ, चैतन्य जोशी, ऋषिकेश भालेराव, तुषार पाथ्रीकर, मयुरेश जाधव, रोहन स्वामनी, सूर्यकांत मानकापे, आयुष शेडगे, सर्वज्ञ पोफळे आदी युवासैनिकांनी आज पक्षात प्रवेश केला
.
What's Your Reaction?