उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो अंतिम, अब्दुल सत्तार बॅकफूटवर, समीर उमेदवारी अर्ज मागे घेणार...?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो अंतिम, अब्दुल सत्तार बॅकफूटवर, समीर उमेदवारी अर्ज मागे घेणार...?
मुंबई, दि.3(डि-24 न्यूज)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे सहा आमदार, एक खासदार यांची औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीबाबत साडेतीन तास चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली जाईल त्यानंतर दोन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो अंतिम राहील अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी बैठक संपल्यानंतर माध्यमांना दिली आहे. यावरून असे स्पष्ट होत आहे अब्दुल सत्तार हे बॅकफूटवर आले आहे. अब्दुल समीर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असे संकेत यावरुन मिळत आहे.
सत्तेसाठी तीनही पक्षांनी मेहनत घेतली. आपला पक्ष वाढवत असेल तर दुसरा पक्ष संपवत असेल ही संपूर्ण माहिती आम्ही आपल्या नेत्यांना दिली. ही माहिती दिल्यावर आमच्या जिल्ह्यातील भाजपाचे नेते जी वागणूक आम्हाला देऊ लागले आहे ती सत्ताधारी नाही तर विरोधकांपेक्षा वाईट देत आहे. यावर आम्ही आमच्या नेत्यांकडे भावना व्यक्त केल्या. असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितले औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात माझे आणि मुख्यमंत्र्यांचे फोनवर बोलणे झाले आहे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्या. उद्या मी कार्यकर्त्यांना बोलावून घेत अर्ज मागे घ्यायला लावणार आहे. यासाठी मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन समीरची उमेदवारी मागे घेतली तर नाराजी राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?