उलमा बोर्डाच्या शैक्षणिक शाखेच्या प्रदेशाध्यक्ष पदी नबी पटेल...

 0
उलमा बोर्डाच्या शैक्षणिक शाखेच्या प्रदेशाध्यक्ष पदी नबी पटेल...

उलेमा बोर्ड शिक्षण विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नबी पटेल यांची नियुक्ती 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)-:  

राज्यात शिक्षण व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नबी पटेल यांची अखिल भारतीय उलेमा बोर्डाच्या शिक्षण शाखा महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केली आहे. अखिल भारतीय उलेमा बोर्डाच्या मुतवल्ली शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल मुजावर यांनी श्री. नबी वजिर पटेल यांना शिक्षण शाखा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदासाठी नियुक्तीपत्र प्रदान केले आणि पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले.

ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नौशाद सिद्दिकी साहेब आणि महासचिव अल्लामा बुनाई हसनी, शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्राचार्य जेबा मलिक यांच्या आदेशानुसार, म शेख फैसल मुजावर यांच्या हस्ते शहरात पत्रकार परिषदेत नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

नियुक्तीपत्र देताना नबी पटेल यांनी अपेक्षा व्यक्त केली की, संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर शिक्षणाविषयी जनजागृती करून गरीब अल्पसंख्याक वर्ग आणि समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना सशक्त करण्यासाठी प्रयत्न केले जावेत.

यावेळी नबी पटेल म्हणाले की, उलेमा बोर्डाने आज दिलेली जबाबदारी ते पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडतील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात दौरा करून सर्व समाजातील बंधू-भगिनींच्या शिक्षणासाठी मदत करतील यावेळी उलेमा बोर्डाच्या मुतवल्ली शाखेचे अनेक अधिकारी उपस्थित होते, ज्यात औरंगाबादच्या अध्यक्षा सीमा शकील मांडविया, शहर उपाध्यक्ष अहमद अली खान, विधी विभागाचे वकील झीशान अली झैदी, नुझात बाजी, सईदा पठाण बाजी इस्माईल पटेल, शिवसेना उद्धव गटाचे ज्योती रवींद्र जगधाने, मुजीब शेख, पैठण तालुका अध्यक्ष शम्सुद्दीन शेख इत्यादींचा समावेश होता. नबी पटेल यांनी सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छाने स्वागत करुन सर्वांचे मनापासून आभार मानले

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow