एमआयएमचा हंडा मोर्चा अक्रामक, महीला दिनाच्या कार्यक्रमात घुसला मोर्चा
एमआयएमचा हंडा मोर्चा अक्रामक, महीला दिनाच्या कार्यक्रमात घुसला मोर्चा
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) किराडपूरा वार्डात पिण्याच्या पाण्याची टंचाई व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत असल्याने एमआयएम आक्रमक झाली आहे.
सकाळी शेकडो महिलांच्या उपस्थितीत हाजी इसाक खान यांनी भव्य हंडा मोर्चा काढत महापालिकेच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चा थेट महिला दिनानिमित्त महीला कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात मोर्चा धडकल्याने सिटीचौक पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले पण महिलांनी मंडपातच पाण्यासाठी घोषणाबाजी केली. यावेळी महीला आघाडीच्या शहराध्यक्ष मोनिका मोरे यांनी मोर्चा सांभाळला. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी एमआयएमच्या शिष्टमंडळाची समजूत काढत मंडपातून प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करण्यास सांगितले. किराडपूरा व शहरातील विविध भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची पाइपलाइन टाकली पण त्यामध्ये पाणी नाही. त्यामध्ये पाणीपुरवठा सुरू करावे. नवीन पाईपलाईनचे काम लवकर पूर्ण करावे. पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे पाणी आठ दहा दिवसाआड येत आहे वेळापत्रक बनवून पाण्याची टंचाई भासणार नाही याचे नियोजन करावे. चेलिपूरा ते रोशनगेट बाजारपेठ असल्याने रमजान महिन्यात या रस्त्यावर उद्योग सुरू असतात यामुळे अतिक्रमण हटवणे व रस्त्याचे काम ईद नंतर सुरू करावे अशी विनंती शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, माजी गटनेते नासेर सिद्दीकी, हाजी इसाक खान, सलिम सहारा, पूर्वचे अध्यक्ष मीर हिदायत अली, पश्चिमचे अध्यक्ष शोएब खान पठाण, फसियोद्दीन सिद्दीकी , एम.एम.शेख, सुमित जमधडे, जकीयोद्दीन सिद्दीकी, नुसरत खान, मोहसीन खान, ठकुजी वानी, मो.दस्तगीर, हाजी हरुन, खतीजा बेगम, गजाला खान, लईका बेगम, शकीला बेगम, मुन्नी बाजी, नाहेदा बेगम, शहेनाज बेगम, झैबुन्निसा बेगम, अहेमद खान, अब्दुल रऊफ, शेख जावेद, नूरा पटेल, हशम खान आदी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?