ऐतिहासिक आमखास मैदानावर उभारणार भव्य दिव्य फुटबॉल स्टेडियम, मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा
ऐतिहासिक आमखास मैदानावर उभारणार भव्य फुटबॉल स्टेडियम, मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) ऐतिहासिक आमखास मैदानावर भव्य दिव्य फुटबॉल व क्रिकेट स्टेडियम जागतिक स्तरावर उभारणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत अल्पसंख्याक विकास तथा वक्फ मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
यावेळी खासदार इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, महापालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत उपस्थित होते.
अब्दुल सत्तार पुढे म्हणाले आमखास मैदान हे 29 एकर 9 गुंठे क्षेत्रात आहे. वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत हि जागा असल्याने दहा दिवसांत जिल्हाधिकारी यांनी कागदपत्रांची तपासणी करून प्रस्ताव तयार करावा. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जागतिक स्तराचे स्टेडियम बनवण्यासाठी दिडशे कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात येईल. डिसेंबर महिन्यांत हज हाऊसचे उद्घाटन व स्टेडियमचे भुमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल. मराठवाड्यात जागतिक स्तराचे खेळाडू निर्माण होतील. शहर व जिल्ह्यातील फुटबॉल व क्रिकेट खेळाडूंना सुविधा उपलब्ध होईल. आता अल्पसंख्याक आयुक्तालयाचे काम लवकरच सुरू होणार आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. क्रीडांगण उभारण्यासाठी समिती असणार आहे. अल्पसंख्याक आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील. वक्फ बोर्डाचे सीईओ सदस्य म्हणून कामकाज बघतील. येथे भव्य फुटबॉल स्टेडियम उभारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य करतील. कोणीही या स्टेडियमला विरोध करणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वक्फ बोर्डाच्या जमीनीवर अवैध कब्जा करणा-यांची आता खैरे नाही....
यावेळी डि-24 न्यूजने अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारले की स्मार्ट सिटीचे कार्यालय वक्फ बोर्डाच्या जागेवर बनलेले आहे आपण या कार्यालयावर कार्यवाही करणार का याचे उत्तर देताना त्यांनी सांगितले हे पण आपलेच कार्यालय म्हणत बोलणे टाळले. मराठवाडा व राज्यात 9 हजार जणांना वक्फ बोर्डाच्या जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. ज्या वक्फ जागेवर अवैध अतिक्रमण केले आहे ते हटविण्यात येणार आहे. ज्यांनी बोगस रजिस्ट्री केली असेल ती रद्द होणार आहे. अवैध अतिक्रमणांवर लवकर बुलडोझर चालणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुरू आहे. त्याबद्दल त्यांनी सांगितले अध्यक्ष जेव्हा निर्णय घेतील जो निर्णय घेतील तो मान्य करु.
आता आमखास मैदान एमआयएमच्या सभेसाठी देणार नाही त्यांनी सभा हैदराबाद येथे घ्यावी असा टोला त्यांनी इम्तियाज जलील यांना लगावला. त्यावर इम्तियाज जलील म्हणाले सभेसाठी दुसरी जागा शोधू पण येथे क्रीडांगण बनावे हि इच्छा आहे. केंद्रीकडून सुध्दा स्टेडियम बनवण्यासाठी निधी आणू असे त्यांनी सांगितले. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे व ओबीसी, मराठा आरक्षण आंदोलनावर त्यांनी सांगितले हा तोडगा कायदेशीर सुटेल. आपसात वाद विवाद न करता तोडगा काढता येईल. थोडा संयम धरावा असे आवाहन त्यांनी मराठा व ओबीसी समाजाला केले आहे.
What's Your Reaction?