ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर वंचितला मतदान करा - अॅड प्रकाश आंबेडकर

ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर वंचितला मतदान करा - अॅड प्रकाश आंबेडकर
आमखास मैदानावरील जाहीर सभेत केले मतदारांना आवाहन, आरक्षण जाण्यासाठी काँग्रेस भाजपा जवाबदार, आरक्षण टिकवण्यासाठी आपले आमदार विधानसभेत पाठवा हिच वेळ आहे, हि लढाई आरक्षण वाचवायची आहे...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे असे आवाहन ऐतिहासिक आमखास मैदानावर झालेल्या भव्य जाहीर सभेत वंचितचे सर्वेसर्वा अॅड प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक राज्य सरकारने घ्यावे. ओबीसींच्या लोकसंख्येचा डाटा न्यायालयात उपलब्ध नाही. या समाजाची टक्केवारी किती आहे हे ठरवण्यासाठी जनगणना करावी लागेल. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय, शैक्षणिक, नोकरीतले आरक्षण संपण्याची भीती आहे. हे आरक्षण बाधित ठेवण्यासाठी आपले आमदार विधानसभेत पाठवावे लागेल. ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम आरक्षणावर टाच आलेली आहे. न्यायालयाने जो निकाल दिला त्याविरोधात आंदोलन करता येत नाही म्हणून तो निर्णय रद्द करण्याचा अधिकार लोकसभा व विधानसभेला आहे. म्हणून वंचित समाजाचे आमदार विधानसभेत पाठवा. ओबीसी आरक्षण बचावो यात्रा भर पावसात राज्यात काढली त्याचा परिणाम असा झाला वातावरण शांत झाले. हि यात्रा काढली नसती तर ओबीसींचे घरे पेटली असती. भाजपा आणि काँग्रेस आरक्षण विरोधी आहे त्यांना आरक्षण संपवायचे आहे म्हणून हि लढाई ओबीसी, एससी एसटी आरक्षण वाचवण्याची आहे. मनोज जरांगे पाटील यांना हे कळले म्हणून त्यांनी अंग काढून घेतले. जनगणनेशिवाय पर्याय नाही तेव्हाच जे वंचित घटक आहे तेव्हाच आरक्षणाचा लाभ मिळेल. एससी व एसटीचे आरक्षण संपले असे मी मानतो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नादी लागला होता. एससी, एसटी आरक्षणाचे वर्गीकरण करावे लागेल व क्रीमीलेयरची अट टाकली गेली हे तुम्हाला मान्य आहे का. क्रीमीलेयर मध्ये पण वेगळे निकष लावले गेले. त्यामध्ये असे म्हटले आहे एका कुटुंबातील एका सदस्याने आरक्षणाचा लाभ घेतला तो क्रिमिलेयरमध्ये आहे हे तुम्हाला मान्य आहे का म्हणून हे आरक्षण पण संपवण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. आरक्षण संपले तर शासकीय कार्यालये, दवाखाने, उच्चपदावर स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी आपली माणसे दिसणार आहे जी आज दिसत आहे. म्हणून म्हणतो महायुती व महाविकास आघाडीला धडा शिकवा व वंचितला निवडून आणा.
कटेंगे तो बटेंगे या ना-याचाही आंबेडकरांनी समाचार घेतला ते म्हणाले अगोदरच मराठा आणा ओबीसी वाटणी झाली आहे. ओबीसी म्हणतो मराठ्याला मत देणार नाही. मराठा म्हणतो ओबीसीला मत देणार नाही. हे खेळी भाजपा व काँग्रेसची आहे. धर्म संकटात आले असेही वक्तव्य केले जात आहे जोपर्यंत देव्हाऱ्यात देव आहे तोपर्यंत धर्म संकट नाही तर आरक्षण संकटात आले आहे ते आपल्याला वाचवायचे आहे. समाजात फुट पाडायची आहे म्हणून फुले, शाहु, आंबेडकर यांना मानणा-यांनी वज्रमूठ बांधून वंचितला मतदान करुन या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन त्यांनी जाहीर सभेत केले.
यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, ओबीसी नेते वाघमारे सर, प्रदेश प्रवक्ते तय्यब जफर, अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष योगेश बन, शहराध्यक्ष अॅड पंकज बनसोडे, औरंगाबाद पूर्वचे उमेदवार अफसरखान, मध्यचे उमेदवार जावेद कुरैशी, पश्चिमचे उमेदवार अंजन साळवे, सिल्लोडचे उमेदवार बनेखा पठाण, कन्नडचे अयाज मकबूल शाह, फुलंब्रीचे महेश निनाळे, पैठणचे अरुण घोडके, गंगापूर अनिल चंडालिया, वैजापूर किशोर जेजूरकर यांची उपस्थिती हो
ती.
What's Your Reaction?






