औरंगाबाद नामांतराची अधिसूचना जनतेची फसवणूक - एसडीपिआय

औरंगाबाद, उस्मानाबाद नाव बदलाची अधिसूचना ही जनतेची फसवणूक आहे, सरकारने ती त्वरित मागे घ्यावी.
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी रात्रीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी अधिसूचना जाहीर केली आणि औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हा, तालुका आणि विभागाचे नाव बदलले, महाराष्ट्र सरकारने घाईघाईने घेतलेला हा निर्णय सत्ता गमावण्याची भीती दाखवतो तसेच विकास आणि आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा राज्य सरकारचा हेतू यातून दिसून येतो, आणि या मध्ये धार्मिक ध्रुविकरण ही करण्यात येत आहेत. म्हणूनच आम्ही सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) या नाव बदलाच्या निर्णयाला विरोध करत आहोत, महत्त्वाच्या मुद्या वरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी घेतलेल्या ‘औरंगाबाद’ नाव बदलाच्या निर्णयाची अधिसूचना ताबडतोब परत घ्यावी, या साठी आज विभागीय आयुक्त कार्यालय समोर धारण प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष सय्यद कलीम, मुस्लिम अवआमई कमेटीचे अध्यक्ष इलियास किरमानी, प्रदेश उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदेश सचिव साजिद पटेल, प्रेदेश कोषाध्यक्ष यूसुफ पटेल, जिल्हा अध्यक्ष मोहसिन खान, प्रदेश सदस्य ज़ुबैर पहेलवान, जिल्हा महासचिव नदीम शेख, जिल्हा सचिव साकी अहेमद, जिल्हा कोषाध्यक्ष हफिज़ अबुज़र पटेल, अफसर खान(काँग्रेस) उबेद इनामदार (AAP), अफसर पठान(VBA) अज़ीम इन्क़िलाब, और पार्टी के पदाधिकारी और सदय मोठे संख्याने उपस्थित होते,
What's Your Reaction?






