कर थकबाकीदारांवर महापालिकेची जप्ती कारवाई, एकूण 8 मालमत्ता सील

 0
कर थकबाकीदारांवर महापालिकेची जप्ती कारवाई, एकूण 8 मालमत्ता सील

कर थकबाकीदारांवर महानगरपालिकेची जप्ती कार्यवाही : एकूण 8 मालमत्ता सील....

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- मनपा आयुक्त श्री अमोल येडगे यांनी मालमत्ता धारकांना थकित कर भरून जप्तीची कार्यवाही टाळावी असे आवाहन केले होते. त्यानंतर आज दिनांक 24.09.2026 रोजी अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त (कर निर्धारक व संकलक) श्री विकास नवाळे यांनी सर्व झोन कार्यालयातील कर वसूली पथकांना थकबाकीदारांच्या याद्या देउन कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार आज झोन 1 च्या पथकाने 2 मालमत्तांवर कार्यवाही करून 2 लाख रुपये वसूल केले. झोन 2 तर्फे 3 मालमत्तांवर कार्यवाही करून 2 लाख रुपये वसूल करण्यात आले. झोन 4 च्या कर्मचाऱ्यांनी 4 मालमत्ता सील केल्या तर झोन 7 च्या पथकाने 3 मालमत्ता सील करून 4 लाख रुपयांचे धनादेश घेतले. झोन 9 च्या पथकाने 4 मालमत्ता सील करून 5.22 लाख वसूल केले तर झोन 10 ने 2 सील करून 6.94 लाख कर वसूल केला. एकूण 18 थकीत मालमत्ता धारकांवर कार्यवाही करून 20 लाख रुपये एवढा कर वसूल केला. आत्तापर्यंत मनपा कर वसुली पथकांनी एकूण 134 मालमत्तावर सिलिंगची कार्यवाही केली आहे. 

 मालमत्ताकराची रक्कम पुर्ण भरणा केल्याशिवाय मालमत्तेचे सील उघडण्यात येणार नसल्याचे तसेच विहित मुदतीत रक्कम भरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्ता विक्री करण्यात येतील असे मनपा आयुक्त श्री अमोल येडगे यांनी स्पष्ट केले तसेच इतर थकबाकीदार मालमत्ता धारकांनी त्वरीत थकित कर भरून जप्तीची कार्यवाही टाळावी असे आवाहनही त्यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow