काँग्रेसच्या बैठकीत राडा, उमेदवारीसाठी बोली, प्रभारीसमोरच भिडले कार्यकर्ते...! उमेदवारीसाठी लागली बोली
काँग्रेसच्या बैठकीत राडा, पक्षाचे प्रभारी आमदार राजेश राठोड यांच्यासमोर भिडले कार्यकर्ते... उमेदवारीसाठी लागली बोली तर शहरातील तीनही जागेवर काँग्रेस लढणार असल्याचा ठराव घेतला...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.23(डि-24 न्यूज) काँग्रेसचे पक्ष कार्यालयात आज पक्षाचे प्रभारी आमदार राजेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पक्षाचे प्रभारी यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने खळबळ उडाली.
अनुसूचित जाती विभागाचे प्रवक्ते डॉ.पवन डोंगरे व काँग्रेस शहर जिल्हा कमेटीचे महासचिव अनिस पटेल यांच्यात मानापमान व सत्कार न केल्याने बाचाबाची झाली. हातवारे करत पवन डोंगरे अनिस पटेल यांच्या अंगावर धावून गेले. अनुसूचित जाती विभागाचे नेते उपस्थित असताना सत्कार न करता डावलण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली. उपस्थित नेत्यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. शहराध्यक्ष युसुफ शेख यांना माईक हातात घेऊन पक्षाच्या शिस्तीचे पालन करावे. असे म्हणत वातावरण शांत केले. हे वाद बघून पक्षाचे प्रभारी आमदार राजेश राठोड आवाक झाले. राठोड यांचे मार्गदर्शन सुरू असताना युसुफ मुकाती उठले म्हणाले अगोदरच पक्षाने उमेदवार निश्चित करावे अडीच ते तीन लाख मतदारांपर्यंत जाण्यासाठी वेळ पाहिजे हे ऐकताच काँग्रेसचे जेष्ठ आकेफ रझवी म्हणाले तुम्हाला काय समजते खाली बसा गेल्या निवडणुकीत किती मते घेतली होती ते बघा अगोदर तुम्ही नवे आहे असे म्हणताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. नवीन मतदार नोंदणी करणे, बुथ संघटन मजबूत करणे, बीएलएची नियुक्ती करणे व आगामी विधानसभा निवडणुक समोर ठेवून जनतेमध्ये जावून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली परंतु इच्छूकांमध्ये राडा बघून काँग्रेस पक्षात आता शिस्त उरली नाही असा संदेश समाजात गेला आहे. आपसात असे भांडत असतील तर निवडणूक कशी जिंकता येईल असा चिमटा बैठकीत मार्गदर्शन करताना जेष्ठ नेते प्रकाश मुगदीया यांनी काढला व आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील तीन मतदारसंघ महाविकास आघाडीत कसे सुटतील प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहे. अल्पसंख्याक समाजाला या निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्यासाठी अहवाल पक्ष श्रेष्ठिंना पाठवण्यात येईल. इच्छूकांची संख्या जास्त असल्याने पक्षाने जो उमेदवार दिला त्यांचा प्रचार एकदिलाने करावा. आपसात लढण्यात वेळ घालवू नका काही गोष्टी लक्षात आले ते दूर केले जातील एका माणसांमुळे 25 लोक दुरावत असतील तर ते योग्य नाही. आपण एक निष्ठेने काम करा न्याय नक्की मिळेल असे आमदार राठोड म्हणाले.
यावेळी इच्छूकांच्या सूचना प्रभारींनी ऐकून घेतले अनुसूचित जाती विभागाचे डॉ.पवन डोंगरे हे सुध्दा आरक्षित असलेल्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनी म्हटले हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे घ्यावा मला उमेदवारी मिळाली तर मी या मतदारसंघातील 35 वार्डात महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला प्रत्येकी पाच लाख रुपये प्रचारासाठी देईल तर डॉ.अरुण सिरसाठ यांनी सांगितले मला या मतदारसंघातून उमेदवारी दिली तर दहा लाख रुपये प्रचारासाठी देईल अशी बोली बैठकीत उमेदवारीसाठी लावण्यात आल्याने तिकीटासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून आले. औरंगाबाद पूर्व व मध्य मतदारसंघात मुस्लिम अल्पसंख्याक मतदार जास्त असल्याने एक तरी उमेदवार अल्पसंख्याक उमेदवार देण्यात यावे अशी मागणी यावेळी पक्षाकडे करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख यांनी सांगितले पक्षाची ताकत माझ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात वाढली आहे. पक्षाची ताकत आहे म्हणून थोडे वादविवाद होत असतात. आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारख्या चुका होणार नाही एकदिलाने काम करु असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस लढणार असा ठराव बैठकीत घेण्यात आला.
यावेळी बैठकीत प्रकाश मुगदीया, इब्राहिम पठाण, मोहन देशमुख, भाऊसाहेब जगताप, महीला काँग्रेस अध्यक्षा दिपाली मिसाळ, सरोज मसलगे पाटील, सागर नागरे, जयप्रकाश नारववरे, डॉ.अरुण सिरसाठ, अॅड अक्रम सय्यद, डॉ .सरताज पठाण, गुलाब पटेल, आकेफ रझवी, अनिस पटेल, मोईन इनामदार, डॉ.निलेश आंबेंवाडीकर, इंजि. इफ्तेखार शेख, रेखा राऊत, नदीम सौदागर, अनिता भंडारी, बबन डिडोरे, शेख रईस, उमाकांत खोतकर, राहुल सावंत, परवीन बाजी देशमुख, नगमा सिद्दीकी, रेखा मुळे, अॉड सुभाष देवकर, अहेमद पटेल, मोईन कुरेशी, मुदस्सर अन्सारी, जकी मिर्झा, चंद्रकांत बनसोडे, ज्ञानेश्वर ढेपे, कैसर बाबा, सलीम खान, सय्यद फयाजोद्दीन, शेख फैज, जाफर खान, सुमित नन्नावरे, वैशाली तायडे, स्वाती बासू, पप्पू ठुबे, प्रकाश सानप, श्रीकृष्ण काकडे, विद्या लांडगे, विजय कांबळे, आकाश रगडे, योगेश थोरात, चंद्रप्रभा खंदारे, सलमा बाजी, मजाक खान, शफीक शहा, सलमान खान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?