काँग्रेसच्या वतीने नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न...
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती उत्साहात संपन्न...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.9(डि-24 न्यूज)-
जिल्हा काँग्रेस कमीटीच्या वतीने आज काँग्रेसचे कार्यालय गांधी भवन येथे जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायत ,सिल्लोड, पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात संपन्न झाल्या. या मुलाखतीसाठी उपस्थितीत वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष तथा मा. खासदार डॉ. कल्याणराव काळे, जिल्हा प्रभारी तथा प्रदेश उपाध्यक्ष मा. खा. तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटेल, जिल्हाध्यक्ष श्री. किरण पाटील डोणगावकर, प्रदेश पदाधिकारी जिल्हा प्रभारी विधानसभा प्रभारी श्री नामदेवराव पवार, विश्वासराव शिंदे, डॉ. जफर अहेमद खान ,सत्येंद्र भुसारी, महंमद इसरार, शहराध्यक्ष युसुफ शेख, कमाल फारुकी, मोहन देशमुख, रविंद्र काळे, एड सय्यद अक्रम, अशोक डोळस, संदीप ढवळे, लहुजी शेवाळे, डॉ. सरताज पठाण, अनिस पटेल, अभिषेक शिंदे, विश्वास औताडे, आतिश पितळे, संतोष शेजुळ, सूर्यकांत गरड, अनिल नलावडे, संतोष मेटे, मनोज शेजुळ, भास्कर घायवट, विनोद तांबे, सर्जेराव चव्हाण, राहुल संत काँग्रेस पदाधिका-यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या. प्रथम फुलंब्री नगरपंचायतच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती पार पडल्या. फुलंब्री नगरपंचायत अध्यक्षपदी खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे व 17 प्रभाग आहे या सर्व साठी जवळपास 30 उमेदवार उपस्थित होते. सिल्लोड नगराध्यक्ष हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे व एकूण 14 प्रभाग आहे. 14 प्रभागातून 28 उमेदवार निवडणूक लढवणार आहे. सिल्लोड तालुक्यातून ही बरेच उमेदवार उपस्थित होते. त्या नंतर पैठण नगरपरिषदच्या मुलाखती घेण्यात आल्या. पैठण नगराध्यक्ष हे खुले महिला साठी राखीव आहे व एकूण बारा प्रभाग आहे बारा प्रभाग मध्ये 24 उमेदवार निवडून द्यायचे आहे. यासाठी 59 उमेदवार मुलाखतीसाठी हजर होते. वैजापूर नगराध्यक्षपद हे ओबीसी पुरुष साठी राखीव आहे व एकूण 12 प्रभाग आहे 12 प्रभागातून 24 उमेदवार राहणार आहे. वैजापूर येथूनही मुलाखतीसाठी 40 उमेदवार उपस्थित होते. कन्नड नगरपरिषद अध्यक्ष पद हे खुला महिला प्रवर्ग साठी राखीव आहे व एकूण बारा प्रभाग आहे 12 प्रभागातून 24 उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहे. कन्नड इथूनही 45 उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होते. तसेच गंगापूर नगरपरिषदेचे ही उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होते. गंगापूर नगर परिषद अध्यक्ष हे खुला पुरुषासाठी राखीव आहे व एकूण दहा प्रभाग आहे दहा प्रभागातून वीस उमेदवार निवडून द्यायचे आहे. यावेळी गंगापूर येथून 60 उमेदवारच्या मुलाखती पार पडल्या. तसेच खुलताबाद नगरपरिषद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. दहा प्रभाग आहे आहे, खुलताबाद इथूनही येथूनही 45 ते 50 उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होते. तसेच गंगापूर खुलताबाद व इतर तालुक्यातील बरेच पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आलेले आहे. मुलाखतीसाठी फक्त उमेदवारच बोलवलेले होते. कुठल्याही शक्ती प्रदर्शन करण्यात आले नाही व सर्व मुलाखती सुरळीत पार पडल्या. खासदार डॉ. कल्याण काळे, रेंगे पाटील व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले की आपल्या जास्तीत जास्त नगरपरिषद कसे निवडून येतील सूक्ष्म नियोजन करून जास्त जास्त नगरसेवक व नगरपरिषद अध्यक्ष निवडून आले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
What's Your Reaction?