कालपासून दोन दिवसीय इंटरनॅशनल एज्युकेशन काॅनफरन्स, बोगद्यातून मजूरांना सुखरूप काढणा-यांचा होणार सन्मान

 0
कालपासून दोन दिवसीय इंटरनॅशनल एज्युकेशन काॅनफरन्स, बोगद्यातून मजूरांना सुखरूप काढणा-यांचा होणार सन्मान

कालपासून दोन दिवसीय इंटरनॅशनल एज्युकेशन काॅनफरन्स, शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार गोल्ड मेडल

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शिक्षणात पुढे येऊन देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे व शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अमेरिकेत कार्यरत आय एफ एम आय या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने शहरात दोन दिवसीय इंटरनॅशनल एज्युकेशन काॅनफरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवलेले विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे. या काॅनफरन्सची थीम आहे Indian Education Vision 2050, American Federation of Muslim of Indian Origin 33rd Annual Convention and GALA Awards Ceremony, 30,31 December 2023.

उद्या 30 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 5.30 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात होईल. 31 डिसेंबर सकाळी 10 ते 2.30 वाजेपर्यंत भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात होईल. या कार्यक्रमास रिड एण्ड लिड फाऊंडेशनचे सहकार्य लाभले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत AFMI चे अध्यक्ष अली कुरैशी व रिड एण्ड लिड फाऊंडेशनचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कय्यूम नदवी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांचा पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात आला आहे. उत्तराखंड बोगद्यातून शेकडो मजूरांना सुखरूप बाहेर काढणारे बहाद्दूरांचाहि या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.

30 डिसेंबर रोजी कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील, राज्यसभेच्या खासदार फौजिया खान, शिक्षातज्ञ मुनीर देशमुख, हाफिज मोहम्मद माज, मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी, एएफएमआयचे अध्यक्ष अली कुरैशी, डॉ.मजहर फारुकी, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, सिराज ठाकूर, डॉ.कुतुबोद्दीन, ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, शिक्षातज्ञ मुज्तबा फारुक, मानू, हैदराबाद विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ.मोहंमद असलम परवेझ, डॉ.शेख परवेझ अस्लम, डॉ.मुनीज, बीआर शफी शफी लोखंडवाला, मामून अख्तर, डॉ.मकदूम फारुकी, डॉ.अब्दुल वहाब, डॉ.सना कुतुबुद्दीन, लूकमान खान, अजहर तंबूवाला, डॉ.फरहीन सिद्दीकी, डॉ.सोहेल जकीयोद्दीन, मिस अक्सा दस्तगीर खान व 31 डिसेंबर रोजी विविध शिक्षातज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना ऐकावयास मिळणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow