किराडपुरा मनपा शाळेत वैज्ञानिक प्रदर्शनीचे भव्य आयोजन

किराडपुरा मनपा शाळेत वैज्ञानिक प्रदर्शनीचे भव्य आयोजन
विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच वैज्ञानिक जाणीव आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न - रईसा बेगम
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) किराडपुरा मनपा सेंट्रल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत वैज्ञानिक प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात उर्दू माध्यम आणि सेमी इंग्रजी विभागातील पहिली ते आठवीच्या 50 हुन अधिक विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध पैलू दर्शवणारे माॅडेल्स सादर केले. शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रईसा बेगम अय्यूब खान, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनपाचे प्रशासक जी.श्रीकांत यांच्या "स्मार्ट स्कुल टू बेस्ट स्कूल" प्रकल्प आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने आखलेल्या पाच कलमी शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत या वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
सेमी इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक माॅडेल्सबद्दल उपस्थितांना आत्मविश्वासाने आणि सविस्तर माहिती दिली. त्यांचा हा आत्मविश्वास आणि सादरीकरण पाहून सर्वजण थक्क झाले.
मुख्याधिपिका रईसा बेगम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास लहान वयातच व्हावा यासाठी आम्ही हि वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन केले होते. तसेच त्यांनी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून माॅडेल तयार करून घेण्यासाठी मेहनतीचे कौतुक केले. पालकांनीही उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. विशेषत: पहिली आणि दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक माॅडेल्सबद्दल दिलेली माहिती पाहता आमचा उद्देश सफल झाल्याचे जाणवले.
हि वैज्ञानिक प्रदर्शनी यशस्वी करण्यात शहबाज सर, अब्दुर्रहीम सर, हिना कौसर, फरीहा बिल्किस, यास्मिन कहकशा, नाजेमा खान, फाईजा बेगम, जहाँआरा बानो, सय्यद रेहाना, नाज फिरदौस, आस्मा परवीन, समीरा तबस्सूम आदी शिक्षकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
शेवटी मुख्याध्यापिका रईसा बेगम यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकांचे आभार
मानले.
What's Your Reaction?






