कुठल्याही स्थितीत नागरीकांच्या घराला धक्का लागणार नाही - मंत्री अतुल सावे
कुठल्याही स्थितीत नागरिकांच्या घराला धक्का लागणार नाही- मंत्री श्री अतुल सावे
मंत्री श्री अतुल सावे यांनी केली नवीन डिपी रस्त्याची पाहणी
एकही घर पाडू देणार नाही..
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.10(डि-24 न्यूज ):- शिवाजी नगर पाण्याची टाकी ते तिरुमला मंगल कार्यालय पर्यंत महानगर पालिकेच्या वतीने नवीन DP plan नुसार रस्ता आरक्षित करण्यात आला होता. या रस्त्याची पाहणी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी शनिवारी केली.
या आरक्षित DP प्लॅन नुसार या भागातील जवळ पास 1600 ते 2000 लोकांची घरे जमीनदोस्त केली जाणार होती. त्यामुळे येथील नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत होती. अशात नागरिकांनी पूर्व मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांची भेट घेऊन संबंधित विषय मार्गी लावण्याचे आग्रह धरला होता. त्या अनुषंगाने शनिवारी महानगर पालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या सोबत संबंधित स्थळाची पाहणी केली. या ठिकाणी असलेली घरे जमीन दोस्त होणार नाही याची दक्षता महानगर पालिकेच्या वतीने घेण्यात यावी अशा सूचना यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांनी केल्या.
तसेच रविवारी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे शहरात येणार असून त्यांना भेटून सदरील DP plan मधील रस्ता रद्द करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे देखील मंत्री श्री अतुल सावे यांनी सांगितले. कुठल्याही स्थितीत नागरिकांच्या घराला धक्का लागणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी नागरिकांना दिली.
याप्रसंगी राजेंद्र जंजाळ, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, यांच्या सह मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?